Organized voter awareness program in Kasba Peth Assembly Constituency
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : २१५-कसबा पेठ मतदारसंघ पोटनिवडणुकीचे २६ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान होणार असून त्या अनुषंगाने मतदार जनजागृतीबाबत विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी जाऊन मतदान प्रक्रीया, मतदान ओळखपत्रासोबत आधार ओळखपत्र जोडणी, टपाली मतदान याबाबत माहिती देत आहेत.
राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टलवरील मतदारांसाठी असलेल्या सुविधेबाबत तसेच ऑनलाईन मतदान प्रकियेबाबतही माहिती यावेळी देण्यात येत आहेत.
८० वर्षापेक्षा अधिक वय असणारे मतदार तसेच दिव्यांग मतदार यांना प्रथमच घरामधून टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करता येणार आहे. याकरीता अशा पात्र मतदारांकडून ‘नमुना १२ डी’ हा अर्ज भरून घेण्यात येत आहे.
शाळा व महाविद्यालयीनस्तरावर विद्यार्थ्यांच्या मतदान जागृतीबाबत स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून रॅली आणि गृहभेटीद्वारे मतदान प्रक्रीयेत सहभागी होण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. विविध शाळांमधूनदेखील मतदानाच्या महत्वाविषयी शिक्षकांना माहिती देण्यात येत आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा दिवसे- देवकाते यांनी दिली आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com