शहरात वारीनिमित्त स्वच्छता व प्रबोधनासाठी उतरणार १००० राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक

Savitribai Phule Pune University, Hadapsar News, Hadapsar Latest News,हडपसर मराठी बातम्या

1000 National Service Scheme volunteers will come down for cleanliness and awareness in the city on the occasion of Wari

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने दिनांक 22 ते 24 जून 2022 रोजी पुणे शहरात वारीनिमित्त स्वच्छता व प्रबोधनासाठी उतरणार १००० राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक

२०० राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांच्या सहभागातून राज्यस्तरीय रासेयो दिंडीचे आयोजन

दिनांक 23 जून 2022 रोजी विद्यापीठात उद्घाटन

पुणे : युवक व खेळ मंत्रालय, भारत सरकार, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन आणि मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र ह्यांच्या सहकार्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ विभाग ह्यांच्या वतीने दिनांक २२ जून ते दिनांक १० जुलै, २०२२ या कालावधीत राज्यस्तरीय ‘स्वच्छ वारी-स्वस्थ वारी-निर्मल वारी- हरित वारी – लोकशाही वारी दिंडीचे आयोजन केले आहे.

Savitribai Phule Pune University, Hadapsar News, Hadapsar Latest News,हडपसर मराठी बातम्या
Savitribai Phule Pune University .

यामध्ये प्रामुख्याने दिनांक २२ ते २४ जून, २०२२ या कालावधीत पिंपरी चिंचवड आणि पुणे या शहरांमध्ये १००० विद्यार्थ्यांच्या साहाय्याने स्वच्छता मोहीम आणि पथनाट्याद्वारे प्रबोधन करण्यात येणार आहे. तसेच पुणे ते पंढरपूर या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी महामार्गावर राज्यातील विविध विद्यापीठातील २०० विद्यार्थी स्वयंसेवक पूर्ण वेळ चालणार आहेत.

या महामार्गावर राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांच्या सहभागातून वारीमार्ग व परिसरातील गावांचे सामाजिक, आर्थिक सर्वेक्षण, आळंदी-देहू ते पंढरपूर ह्या दोन्ही आषाढीवारी मार्गावर स्वच्छता मोहिम, वापरलेल्या पत्रावळ्या व निर्माल्य संकलन, उघड्यावर शौचाला न बसता कृत्रिम शौचालय वापराबाबत प्रबोधन, गावकर्यांळची, शाळा-महाविद्यालयांची शौचालये उपलब्ध करणे, पथनाट्य पथकांच्या माध्यमातून गावांमध्ये पर्यावरणीय, लोकशाही व मतदान जनजागृतीसाठी लोकजागरण, वारीमार्गावर वारकरी व गावकर्यांामध्ये पर्यावरणीय उद्बोधन,संलग्नित महाविद्यालयांमार्फत सेंद्रीय खतनिर्मिती आणि शेतकर्यांकना मोफत सेंद्रीय खतवितरण असे विविध उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती विद्यार्थी विविध योजना उपक्रम समितीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य श्री.राजेश पांडे यांनी दिली.

या रासेयो दिंडीचे उद्घाटन दिनांक २३ जून, २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संत ज्ञानेश्वर सभागृह येथे संपन्न होणार आहे.

या राज्यस्तरीय दिंडीसाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, प्र-कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्यसंपर्क अधिकारी डॉ. प्रशांतकुमार वनंजे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषदेचे सर्व सदस्य आणि विद्यापीठ प्रशासनाचे बहुमोल सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे.

राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. संतोष परचुरे ह्या उपक्रमाचे आयोजन करत आहेत.

हडपसर न्युज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *