121st Convocation Ceremony on 27th January
१२१ वा पदवी प्रदान समारंभ २७ जानेवारी रोजी
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा १२१ वा पदवीदान समारंभ दिनांक २७ जानेवारी २०२३ रोजी होणार आहे. विद्यापीठातील मुख्य इमारतीजवळच्या हिरवळीवर दुपारी चारच्या सुमारास हा सोहळा होणार आहे.
या सोहळ्याला राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी हे अध्यक्षीय भाषण करतील, तर संरक्षण मंत्रालयातील संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार डॉ.सतीश रेड्डी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, प्र.कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे आणि कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार यांच्यासह विद्यार्थी व विविध मंडळाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित राहणार आहेत.
एकूण ९६८ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये पदविकेचे ५, पदवीचे ५२८, एम.फिल चे ५, पदव्युत्तर पदविका ३, पीएच.डी चे ११०, पदव्युत्तर पदवी ३१७ असे सर्व शाखेचे एकूण ९६८ विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून देण्यात आली.
यावेळी पीएच.डी च्या ११० विद्यार्थ्यांना समारंभात तर उर्वरित विद्यार्थ्यांना पोस्टाद्वारे पदवी त्यांच्या पत्त्यावर पाठविण्यात येणार आहे असे परीक्षा विभागातील उपकुलसचिव व परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ.अनिल लोखंडे यांनी सांगितले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com