13 cities in China shut down due to increasing corona outbreak
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चीनमधल्या १३ शहरांमध्ये टाळेबंदी
चीनमध्ये आज जवळपास ३ हजार ३०० नवीन कोविड प्रकरणे नोंदवली गेली. चीनमधील कोविडची स्थिती गंभीर होत चालली असल्याचं राष्ट्रीय आरोग्य आयोगानं सांगितलं आहे.
साधारण १३ शहरे लॉकडाऊन अंतर्गत आहेत आणि जवळपास ४० दशलक्ष रहिवासी त्यांच्या घरात बंद आहेत. अनेक शहरांमध्ये शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली असून औद्योगिक उपक्रम प्रभावित झाले आहेत.
अधिका्यांनी नवीन प्रकरणांसाठी तात्पुरती रुग्णालये आणि सुविधा उभारण्यासाठी प्रयत्न वाढवले आहेत.
चीनचे उपप्रधानमंत्री सुन चुनलान यांनी मंगळवारी प्रांतातील परिस्थितीचा आढावा घेतला. मेनलँड चीन वाढत्या ओमिक्रॉनच्या प्रादुर्भावाचा सामना करत आहे.
जिलिनमध्ये गेल्या १५ दिवसांत ८,००० हून अधिक प्रकरणं तर मेनलँड चीनमध्ये गेल्या दोन आठवड्यांत १५००० हून अधिक प्रकरणं जोडली गेली आहेत. या वाढीदरम्यान, राष्ट्रीय आरोग्य आयोगानं सांगितले की, मंगळवारपर्यंत चीनच्या मुख्य भूभागावर ३.२ अब्जाहून अधिक COVID-19 लसीचे डोस देण्यात आले आहेत.