चीन मध्ये कोरोनाच्या १३ हजार नव्या रुग्णांची नोंद

13,000 new corona patients registered in China

चीन मध्ये कोरोनाच्या १३ हजार नव्या रुग्णांची नोंद

चीन मध्ये आज कोरोनाचे १३ हजार नवे रुग्ण आढळले असून नव्या रुग्णांचा ही संख्या कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून गेल्या दोन वर्षातली सर्वाधिक संख्या आहे. त्यामुळं चीनची आर्थिक13,000 new corona patients registered in China,हडपसर मराठी बातम्या , Hadapsar Latest  News, Hadapsar News राजधानी आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शांघाय शहरात पूर्णतः लॉकडाउन  लावण्यात आला आहे.

या लॉक डाउन मुळे शांघाय शहरातून होणारा मालाचा पुरवठा आणि वाहतूक व्यवस्थेवर आणखी परिणाम होण्याची शक्यता आहे.

शांघायमध्ये सध्या होत असलेल्या  कोरोनाच्या प्रसाराचं प्रमाण यापूर्वी वुहान शहरात झालेल्या प्रसाराहून जास्त आहे. मात्र तुलनात्मक दृष्ट्या त्याच्या तीव्रतेचं प्रमाण कमी असल्याचं चीनच्या वृत्त संस्थेनं म्हटलं आहे.
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *