देशात सध्या 13,92,265 इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर

Electric Vehicle charging stations

There are currently 13,92,265 electric vehicles on the road in the country

देशात सध्या 13,92,265 इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर

नवी दिल्ली : देशात सध्या 13 लाख 92 हजार 265 इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर धावत असल्याचे सरकारने म्हटले आहे. यामध्ये वाहन श्रेणीनुसार पाच लाख ४४ हजार

EV charging stations
Image Source: https://commons.wikimedia.org/

दुचाकी, सात लाख ९३ हजार तीन चाकी आणि ५४ हजार चारचाकी वाहनांचा समावेश आहे. राज्यसभेत आज एका लेखी उत्तरात अवजड उद्योग राज्यमंत्री कृष्ण पाल गुर्जर यांनी ही माहिती दिली.

श्री गुर्जर म्हणाले, उपलब्ध माहितीनुसार VAHAN-4 नोंदणी प्रमाणपत्राच्या केंद्रीकृत डेटाबेस वरआर्थिक वर्ष 2021-22 मध्ये इलेक्ट्रिक वाहनांची विक्री आर्थिक वर्ष 2020-21 च्या तुलनेत तिप्पट वाढून एक लाख 34 हजार 460 वरून चार लाख 28 हजार 224 झाली आहे.

मंत्र्यांनी जोर दिला की इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीतील वाढ हे मुख्यत्वे FAME इंडिया स्कीम फेज-II अंतर्गत दिलेल्या प्रोत्साहनामुळे आहे; जे Faster Adoption and Manufacturing of  Hybrid and Electric Vehicles( FAME) निकषांची पूर्तता करणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीदारांना इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदी किमतीत आगाऊ कपात करण्याच्या स्वरूपात प्रदान करण्यात आले होते.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *