Greetings from Deputy Chief Minister on the occasion of Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj’s Memorial Day.

Greetings from Deputy Chief Minister Ajit Pawar on the occasion of Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj’s Memorial Day.

Mumbai, dt. 6: – Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj created an ideal state of social justice. Compulsory education, reservation for the weaker sections, creation of infrastructure, justice for all sections through revolutionary social reforms, an opportunity for development. Rajarshi Shahu Maharaj’s thought has the power to keep the society united and move forward, in such words, Deputy Chief Minister Ajit Pawar has reminded him of the work of Rajarshi Shahu Maharaj and greeted him.

Rajarshi Shahu Maharaj, the father of social justice, opened the doors of education to all sections of society. Built schools, hostels. Built dams for farmers. Created markets. Rajarshi Shahu Maharaj, who enacted laws for education, abolition of caste discrimination, reservation in jobs, women’s emancipation, was a great social reformer of revolutionary ideas.

Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj has the power to keep the society united and move forward

Shahu Mharaj
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj’s Memorial Day.

– Deputy Chief Minister Ajit Pawar.

Rajarshi Shahu Maharaj carried forward the truth-seeking thought of Mahatma Phule. He encouraged Dr. Babasaheb Ambedkar, the sculptor of the Indian Constitution, by helping him with his education. Prohibited by opposing superstitions, untouchability, undesirable practices, norms, traditions. Enacted law for interracial marriage. Rajarshi Shahu Maharaj, the father of the concept of social justice and reservation, has the power to keep the society united and move forward. The Mahavikas Aghadi government is working on the thoughts of Rajarshi Shahu Maharaj, said Deputy Chief Minister Ajit Pawar on the occasion of Rajarshi Shahu Maharaj’s Memorial Day.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीदिनानिमित्त  उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन.

मुंबई, दि. 6 :- राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी सामाजिक न्यायाचे आदर्श राज्य निर्माण केले. सक्तीचे शिक्षण, दुर्बल घटकांना आरक्षण, पायाभूत सुविधांची निर्मिती, क्रांतिकारी सामाजिक सुधारणा करून सर्व घटकांना न्याय, विकासाची संधी दिली. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारातच समाजाला एकजूट ठेवून पुढे घेऊन जाण्याची ताकद आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले आहे.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारातच समाजाला एकजूट ठेवून पुढे घेऊन जाण्याची ताकद 

Shahu Mharaj
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा स्मृतीदिन.

– उपमुख्यमंत्री अजित पवार.

सामाजिक न्यायाचे जनक राजर्षी शाहू महाराजांनी समाजातील सर्व घटकांना शिक्षणाची दारे खुली केली. शाळा, वसतिगृहे बांधली. शेतकऱ्यांसाठी धरणे बांधली. बाजारपेठा निर्माण केल्या. बहुजनांना शिक्षण, जातिभेद निर्मूलन, नोकऱ्यांमध्ये आरक्षण, स्त्रीमुक्तीसाठी कायदे करणारे राजर्षी शाहू महाराज लोककल्याणकारी राजे, क्रांतिकारी विचारांचे थोर समाजसुधारक होते. 

राजर्षी शाहू महाराजांनी महात्मा फुले यांचा सत्यशोधक विचार पुढे नेला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी मदत करून प्रोत्साहन दिले. अंधश्रद्धा, अस्पृश्यता, अनिष्ट प्रथा, रुढी, परंपरांना विरोध करून बंदी घातली. आंतरजातीय विवाहासाठी कायदा केला. सामाजिक न्यायाच्या, आरक्षणाच्या संकल्पनेचे जनक असलेल्या राजर्षी शाहू महाराजांच्या विचारातच समाजाला एकजूट ठेवून पुढे नेण्याची ताकद आहे. महाविकास आघाडीचे सरकार राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांवर कार्य करत आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले.

Pune Municipal Corporation will set up a 50-bed Covid Hospital for children and nine specialists will be recruited.

Pune, May 5: The coronavirus vaccine has not yet been introduced to children. Therefore, Pune Municipal Corporation will start a separate 50-bed covid hospital for children up to 18 years at Rajiv Gandhi Hospital in Yerwada. Nine pediatricians will be recruited for this.

Corona infection can increase in young children. To treat them, a 50-bed Kovid Hospital has been planned at Rajiv Gandhi Hospital in Yerawada, especially for children. If all the families are positive, we try to ensure that the children and parents are treated in the same place. The corporation currently has nine pediatricians, nine more pediatricians will be appointed.

– Rubel Agarwal, Additional Commissioner, Pune Municipal Corporation

Emphasis will be placed on vaccination to prevent a third wave of the corona. However, the corona vaccine is not available for children under the age of 18. Children between the ages of 1 and 9 have higher immunity to various vaccines, but children between the ages of 10 and 18 have lower immunity and cannot be vaccinated against corona. Mutants of the third virus are more likely to be harmful and are feared to spread the infection even in young children. Therefore, MLA Sunil Tingre has provided a fund of Rs. 1 crore to start a special 50-bed Covid Hospital at Rajiv Gandhi Hospital.

लहानांसाठी पुणे महापालिका उभारणार  ५० बेडचे  कोविड रुग्णालय,  केली जाणार नऊ तज्ज्ञांची भरती. 

पुणे, ५ मे : लहान मुलांना कोरोना प्रतिबंधक लस अद्याप आलेली नाही, त्यातही तिसऱ्या लाटेत लहान मुलांना व १८ वर्षांपर्यंतच्या मुलांना कोरोनाचा धोका जास्त होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. त्यामुळे पुणे महापालिकेतर्फे येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालयात १८ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी स्वतंत्र ५० बेडचे कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी नऊ बालरोगतज्ज्ञांची भरती केली जाणार आहे.

लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयामध्ये खास लहान मुलांसाठी ५० बेडचे कोविड रुग्णालय नियोजन केले आहे . सर्व कुटुंब पॉझिटिव्ह असल्यास, मुले आणि पालकही एकाच ठिकाणी उपचार घेतील, असा आमचा प्रयत्न आहे. महापालिकेकडे सध्या नऊ बालरोगतज्ज्ञ आहेत, आणखी नऊ बालरोगतज्ज्ञांची नियुक्ती केली जाणार आहे.

– रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका

 

कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी लसीकरणावर भर दिला जाणार आहे. पण, १८ वयोगटाखालील मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध नाही. १ ते .९ वर्षांच्या मुलांना विविध लस दिल्या असल्याने त्यांची रोगप्रतिकारशक्ती जास्त असते, पण त्या तुलनेत १० ते १८ वयोगटातील मुलांची प्रतिकारशक्ती कमी होते आणि  त्यांना कोरोना प्रतिबंधक लस देता येत नाही. तिसऱ्या विषाणूचे म्युटंट अधिक  हानीकारक असण्याची शक्यता आहे  आणि लहान मुलांमध्येही संसर्ग पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राजीव गांधी रुग्णालयात ५० बेडचे खास कोवीड रुग्णालय सुरू करण्यासाठी आमदार सुनील टिंगरे यांनी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

Drive-in vaccination should be started, demanded MLA Chetan Tupe to the Commissioner.

Hadapsar MLA Chetan Tupe Patil has asked Municipal Commissioner Vikram Kumar to start drive-in vaccination to make covid vaccine easily available to senior citizens and persons with disabilities in Pune. The city of Pune has a large number of senior citizens with disabilities. In addition, many senior citizens and persons with disabilities may find it difficult to go to the center to get vaccinated due to their limited physical activity due to their age.

According to the initiatives implemented by the Mumbai Municipal Corporation, senior citizens, persons with disabilities come directly to the vaccination center in a vehicle and are vaccinated while sitting in the vehicle, on same lines, the Pune Municipal Corporation should start such a facility, suggested NCP MP Sansad Ratna Supriya Sule. The Pune Municipal Corporation should immediately start a driver-in-vaccination facility for senior citizens and persons with disabilities to get easy access to the vaccine.

Daily Corona Count

ड्राईव्ह इन लसीकरण सुरू करावे,  आमदार चेतन तुपे यांची आयुक्तांकडे मागणी . 

पुण्यातील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना कोविंड प्रतिबंधक लस सहजपणे उपलब्ध व्हावी यासाठी ड्राइव्ह इन लसीकरण सुरू करण्यात यावे अशी मागणी हडपसर चे आमदार चेतन तुपे पाटील यांनी मनपा आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडे केली आहे . पुणे शहरामध्ये ज्येष्ठ नागरिकांनी दिव्यांग व्यक्ती यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.  त्यातच अनेक ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्ती यांना वयोमानानुसार आता शारीरिक हालचालींना मर्यादा असल्याने केंद्रावर जाऊन लस घेणे अडचणीचे ठरू शकते,  तसेच लसीकरणास  आवश्यक प्रक्रिया पार पाडून लस  मिळेपर्यंत लागणारा वेळ लक्षात घेता , ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्ती यांना ही प्रक्रिया  गैरसोयीची ठरू शकते . 

मुंबई महानगरपालिकेने राबविलेल्या उपक्रमांनुसार  ज्येष्ठ नागरिक,  दिव्यांग व्यक्ती वाहनातून थेट लसीकरण केंद्रावर येतात  व गाडीत  बसून  त्यांना लस दिले जाते,  याच धर्तीवर पुणे महानगरपालिकेने अशी सुविधा सुरू करावी अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार संसद रत्न सुप्रिया सुळे यांनी केली आहे .  पुणे मनपाने ही ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींना कोविड प्रतिबंधक  लस घेण्याची  सहज सोपी सुविधा मिळावी म्हणून उपयुक्त ठरणारी  ड्रायव्हर इन  लसीकरण ही सुविधा तातडीने सुरू करावी करण्यात यावी.

Dr. Patil was honored with ‘Suryadatta Seva-Ratna Rashtriya Puraskar 2021’ by the hands of Krishna Prakash.

Pune: Dr. PD Patil’s dedicated, socially conscious work is impressive and ideal for society. He is a visionary and always works with calmness, determination, and commitment. His work in the field of education, health, culture, literature, and social is notable and directive to others, said Krishna Prakash, Commissioner of Police, PCMC. He was speaking when Dr. P. D. Patil, Chancellor of Dr. D. Y. Patil Vidyapeeth honored with ‘Suryadatta Seva-Ratna Rashtriya Puraskar 2021’ by the Suryadatta Group of Institutes Pune.

 The award presentation ceremony was held on Wednesday, 5th May 2021 at DY Patil Auditorium, Pimpri Pune. Krishna Prakash, Commissioner of Police, PCMC was the Chief Guest, Dr. Bhagyashree P. Patil, Pro-Chancellor of Dr. D. Y. Patil Vidyapeeth was the guest of honor, Dr. Smita Jadhav, Trustee & Director of Dr. DY Patil Vidyapeeth, Dr. NJ Pawar, Vice-Chancellor of Dr. DY Patil Vidyapeeth, Dr. Sanjay Chordiya, Founder President & Chairman of Suryadatta Group of Institutes, Sushma Chordiya, Vice President & Secretary of Suryadatta Group of Institutes, Sachin Itkar, Advisory Board Member, Prof Sunil Dhaliwal, Prof. Meelina Raje, Prof. Sayali Deshpande from Suryadatta Group of Institutes and Registrar, Dean, Head of Departments from the DY Patil Vidyapeeth were present on the occasion. 

This program took place following the rules regarding COVID-19 & it was broadcasted on Facebook and YouTube. Dr. Sanjay Chordia announced the ‘Chancellor Dr. PD Patil Merit Scholarship’ for the topper from the various medical branches of Dr. DY Patil Vidyapeeth, Pimpri. This merit scholarship will be given every year in the convocation ceremony with Rs. 11,000/- cash prize and gold medal.

Dr. Patil was honored with 'Suryadatta Seva-Ratna Rashtriya Puraskar 2021' by the hands of Krishna Prakash.
Dr. Patil was honored with ‘Suryadatta Seva-Ratna Rashtriya Puraskar 2021’ by the hands of Krishna Prakash.

Krishna Prakash said that I observed the work done by Dr. PD Patil & his team during this pandemic, closely seen his dedication in Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan and we all are aware of his educational work through Dr. DY Patil Vidyapeeth. He is like Paris, who touches others and makes them also Paris. His hard work, commitment, dedication, passion, determination impressed the lacs of people. Suryadatta Group has awarded a great person and I am also grateful that I honored him. Both institutions are doing great work in the field of education, health, and social service. 

Dr. PD Patil expressed his feelings after receiving the award. He mentioned that It is an honor for my whole team, which is working since last year to overcome this corona pandemic. All the doctors, nurses, and other medical staff are making continuous efforts to save lives. I am very happy and satisfied with saving thousands of lives in this situation. We are able to provide advanced medical services to the patient coming from various parts of the state. With the treatment, we are giving hygienic food, cleanliness, counseling, and other mental support to the patient and their family. I am thankful to Suryadatta Group, Dr. Sanjay & Sushma Chordia for this award.

“During this pandemic, many times we faced issues like oxygen, remedesever shortage. But with the blessings of the god and our beloved Padmashree Dr DY Patil, we overcome these issues. I feel proud of my colleagues, who are working day and night to fight corona. We established this hospital in 2006, today it is playing a crucial role to treat the thousands of patients,” he added.

Prof. Dr. Sanjay Chordiya gave the idea behind the award. He said that We feel proud to honor Dr. PD Patil in recognition of his valuable contribution in the field of medical and social service, particularly the selfless and prompt medical services offered to needy and deserving people across all strata of the society during the pandemic period. This was the first Seva-Ratna award. Every year we will honor the personality working with the same line. Many people, Doctors, Hospitals, organizations are doing great jobs in this pandemic. Dr. DY Patil is one of them.

Sachin Itkar gave the vote of thanks and also briefed Dr. PD Patil’s work in various fields. Sayali Deshpande compared the program and Dr. NJ Pawar gave opening remarks. 

डॉ. पी. डी. पाटील यांचे निःस्वार्थ, सेवाभावी कार्य आदर्शवत कृष्ण प्रकाश यांचे प्रतिपादन;  ‘सूर्यदत्ता तर्फे डॉ. पी. डी. पाटील यांना पहिला ‘सूर्यदत्ता सेवा-रत्न राष्ट्रीय पुरस्कार-२०२१’ प्रदान.

पुणे : “शांत, संयमी पण दूरदृष्टी आणि सामाजिक जाणीव असलेल्या डॉ. पी. डी. पाटील यांचे निःस्वार्थ, सेवाभावी वृत्तीने केलेले कार्य समाजासाठी आदर्शवत आहे. शिक्षण, साहित्य, आरोग्य, सामाजिक क्षेत्रात झोकून देऊन काम करण्याची त्यांची वृत्ती प्रेरणादायी आहे,” असे प्रतिपादन पिंपरीचिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले.  सुर्यादत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे सूर्यदत्ता एज्युसोशियो कनेक्ट इनिशिएटिव्ह अंतर्गत उल्लेखनीय वैद्यकीय सामाजिक सेवेबद्दल डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनासुर्यदत्ता सेवारत्न राष्ट्रीय पुरस्कार२०२१पिंपरीचिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

डॉ. पी. डी. पाटील यांच्या नावाने पारितोषिक देण्याची घोषणाहीसूर्यदत्ताच्या वतीने यावेळी करण्यात आली. पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठातील विविध वैद्यकीय शाखेत अंतिम वर्षात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला पदवी प्रदान समारंभाच्या दिवशी ११ हजार रुपये रोख सुवर्णपदक असे पारितोषिक दिले जाणार आहेपिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील सभागृहात झालेल्या या छोटेखानी सोहळ्यास डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्रकुलगुरू डॉ.

 'सूर्यदत्ता तर्फे डॉ. पी. डी. पाटील यांना पहिला 'सूर्यदत्ता सेवा-रत्न राष्ट्रीय पुरस्कार-२०२१' प्रदान
‘सूर्यदत्ता तर्फे डॉ. पी. डी. पाटील यांना पहिला ‘सूर्यदत्ता सेवा-रत्न राष्ट्रीय पुरस्कार-२०२१’ प्रदान

भाग्यश्री पाटील, विश्वस्त संचालक डॉ. स्मिता जाधव, कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, सुर्यादत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा सचिव सुषमा चोरडिया, सल्लागार सचिन इटकर, संचालक प्रा. सुनील धाडीवाल, प्रा. मिलीना राजे आदी उपस्थित होते. कोरोना विषयक नियमांचे पालन करत  डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठातील कुलगुरू, कुलसचिव, अधिष्ठाता यासह मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. तसेच फेसबुक युट्युबवरून हा कार्यक्रम सर्वांसाठी प्रसारित करण्यात आला.

कृष्ण प्रकाश म्हणाले, “सध्याच्या कोरोना काळात पी. डी. पाटील यांच्यासह त्यांच्या टीमकडून होत असलेले कार्य, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या माध्यमातून उभारलेले शैक्षणिक कार्य एखाद्या परिसासारखे आहे. प्रत्येक कामातील त्यांची जिद्द, कठोर परिश्रम, इच्छाशक्ती, समर्पित भाव प्रभावित करणारा आहे. अशा महान सेवावृत्तीचा सूर्यदत्ता परिवार आणि डॉ. संजय चोरडिया यांनी सन्मान करून कृतज्ञताच व्यक्त केली आहे. ‘सूर्यदत्ताचाही यामुळे सन्मान वाढला आहे. डॉ. डी. वाय. पाटील, सूर्यदत्ता यांसारख्या संस्था चांगले भरीव काम करत आहेत.” 

डॉ. पी. डी. पाटील म्हणाले, “गेल्या वर्षभरापासून कोरोना संकटात आमचे सर्व डॉक्टर, नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी यांच्या अहोरात्र मेहनतीमुळे हजारो रुग्णांवर चांगले उपचार करता आले, याचे समाधान आहे. अत्याधुनिक आरोग्य सुविधा आमच्या सर्वच रुग्णालयात उपलब्ध आहेत. राज्याच्या विविध भागातून, विविध सामाजिक स्तरातील रुग्ण येथे उपचार घेऊन बरे झाले आहेत. त्यांना आरोग्यासह भोजन, स्वच्छता, सकारात्मक राहण्यासाठी मार्गदर्शन अशा अनेक गोष्टी पुरविल्या जातात. हा पुरस्कार केवळ माझा नाही, तर आमच्या सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा आणि संस्थेचा आहे.” 

परमेश्वराच्या आणि पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या कृपेने या कठीण काळात सातत्याने आमचे सर्व डॉक्टर इतर वैद्यकीय कर्मचारी देवदूतासारखे काम करत आहेत. २००६ साली हॉस्पिटल उभारणी केल्याने आज त्याचा उपयोग झाला. चांगले काम करण्यासाठी मनाची प्रेरणा, अनेकांच्या चेहऱ्यावर फुललेला आनंद जोमाने काम करण्यासाठी प्रोत्साहित करतो. स्वतःला वाहून घेऊन काम करणाऱ्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचा मला अभिमान वाटतो. कोरोनाचे संकट भयंकर असून, आपल्याला सगळ्यांना एकत्रित येऊन लढा द्यायचा आहे,” असेही डॉ. पी. डी. पाटील यांनी नमूद केले.

प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “डॉ. पी. डी. पाटील यांनी वैद्यकीय सामाजिक क्षेत्रात योगदान देत देशविदेशातील अनेक विद्यार्थ्यांना उत्कृष्ट वैद्यकीय ज्ञान दिले आहे. तसेच या वर्षभरात कोरोनाच्या संकटात समाजातील गरीब गरजू लोकांना निस्वार्थी, तात्काळ वैद्यकीय सेवा पुरवण्याचा त्यांचा पुढाकार महत्वपूर्ण आहे. असेच कार्य इतर अनेक व्यक्ती, संस्था खासगीसरकारी रुग्णालये करत आहेत. अशा कठीण काळात चांगले काम करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने दरवर्षी सन्मानित केले जाणार आहे. यंदाचा पहिला पुरस्कार डॉ. पी. डी. पाटील यांना सन्मान करताना आनंद वाटतो.”

सचिन इटकर यांनी आभार मानले. डॉ. पी. डी. पाटील यांचे सेवाभावी कार्याबद्दल आभार मनात या कार्यासाठी त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करायला हवी. आरोग्य, शिक्षण, सांस्कृतिक क्षेत्रातपीडीहा ब्रँड झाला असून, त्यांच्यातील कामाप्रती समर्पित वृत्ती, जिद्द आणि इच्छाशक्ती आपल्या सर्वांना प्रेरणा देणारी आहे, असे इटकर यांनी नमुद केले. सायली देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. एन. जे. पवार यांनी प्रास्ताविक केले.

 

Food donations for the poor during the lockdown in Hadapsar.

Meals are distributed to the poor under the Hadapsar flyover. Corona has caused a lockdown in the state. As a result, hotels and restaurants are closed. Wage-earners, poor people living on the sidewalks are starving. Therefore, Harish Gunjal and Swapnil Bhati, citizens of Hadapsar, have started the concept of food sacrifice as a share of salt for the society at their own expense to feed their hungry stomachs. Accordingly, one hundred to three hundred lunch boxes are made daily and distributed free of cost to the needy, beggars, and the poor in the area under the flyover at Hadapsar-Gadital.

 Meals like vegetable chapati, dal rice, khichdi, fruits are alternated in the meal. Friends of Harish Gunjal and Swapnil Bhati for this work, also many women from Adarsh ​​Colony are helping voluntarily. Many generous people in the community have also helped in this food sacrifice. Harish Gunjal and Swapnil Bhati have expressed their determination to distribute food to the needy as long as the lockdown continues. Rohini Gunjal, Poonam Ekhande, Akshada Aurade, Rupali Bhosale, Rani Patil, Surekha Dethe, Pallavi Mule, Sunanda Rathod, Sheetal Dalvi, Sunanda Kudal, Ranveer Aurade, etc. help in cooking every day. Vinayak Dethe, Revappa Kudal, Avinash Borate, Rameshwar, Ajay, Sunil Mohad, Shubham, Amit Dhumal, Sunil Rathode, Shubham Bhati, Praveen Bhosale are also helping the people to grow food.

हडपसरमध्ये  लॉकडाऊनच्या काळात  गरिबांसाठी होतय  अन्नदान.  

हडपसर उड्डाणपुलाखालील असणाऱ्या गोरगरीब  लोकांना जेवण वाटप करण्यात येते. कोरोनामुळे  राज्यामध्ये लॉकडाऊन आहे. त्यामुळे हॉटेल उपहारगृहे ही  बंद आहेत.   रोजंदारीवर काम करणारे, गोरगरीब फुटपाथवर राहणाऱ्या लोकांची उपासमार होत आहे. त्यामुळे त्यांच्या भुकेल्या पोटाला दोन घास देण्यासाठी हडपसर येथील नागरिक हरीश गुंजाळ व स्वप्निल भाटी यांनी स्वखर्चातून   समाजासाठी खारीचा वाटा म्हणून अन्न यज्ञ संकल्पना सुरू केली आहे. त्यानुसार रोज शंभर ते सव्वाशे जेवणाचे डबे बनवून हडपसर-गाडीतळ येथील उड्डाणपुलाखालील या परिसरातील गरजू, भिकारी, गोरगरीब यांना मोफत वाटप केले जातात.

 जेवणात भाजी चपाती, डाळ भात, खिचडी, फळे असे मेनू आलटून पालटून असतात. या कामासाठी हरीश गुंजाळ व स्वप्निल भाटी यांचे मित्र तसेच आदर्श कॉलनीतील अनेक महिला स्वयंस्फूर्तीने मदत करत आहेत. तसेच या अन्न यज्ञासाठी समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी देखील सहाय्य केले आहे. जोपर्यंत लॉकडाऊन सुरू आहे तोपर्यंत गरजूंना अन्न वाटप करण्याचा निर्धार हरीश गुंजाळ व स्वप्निल भाटी व्यक्त केला आहे.रोहिणी गुंजाळ, पूनम एखंडे, अक्षदा औरादे, रुपाली भोसले, राणी पाटील, सुरेखा देठे, पल्लवी मुळे, सुनंदा राठोड, शीतल दळवी, सुनंदा कुडाळ, रणवीर औरादे आदी दररोज स्वयंपाक करण्यासाठी मदत करतात. तसेच लोकांना जेवण वाढण्यासाठी विनायक देठे, रेवाप्पा कुडाळ, अविनाश बोराटे, रामेश्वर, अजय, सुनील मोहड, शुभम, अमित धुमाळ, सुनील राठोड, शुभम भाटी, प्रवीण भोसले आदी मदत करत आहेत. 

 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *