वात्सल्य फाऊंडेशनच्या माध्यमातून १५ खेळाडू मुलींचे घेतले शैक्षणिक पालकत्व

Through Vatsalya Foundation, 15 female sportspersons received educational guardianship

वात्सल्य फाऊंडेशनच्या माध्यमातून १५ खेळाडू मुलींचे घेतले शैक्षणिक पालकत्व

भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांचे अनोखे दातृत्व

पुणे :  वात्सल्य फाऊंडेशनच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील १५ खेळाडू मुलींचे शैक्षणिक पालकत्व मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतलं. काही महिन्यांपूर्वी शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकादमीच्या वतीने मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभावेळी आदरणीय दादांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुला मुलींना शिक्षण आणि खेळासाठी प्रोत्साहन म्हणून शैक्षणिक मदत देण्याचे जाहीर केले होते

त्यानुसार आज शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकादमी आणि वात्सल्य फाऊंडेशनच्या माध्यमातून १५ विद्यार्थ्यिनींचे शैक्षणिक पालकत्व घेतले. कोथरूड मधील शुभारंभ लॉन्स येथे आयोजित एका कार्यक्रमात या मुलींच्या पालकांना वार्षिक शैक्षणिक खर्चाचे धनादेश युवा सुराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून विद्यार्थिनींच्या पालकांकडे सूपुर्द केले.यावेळी दादांचे दातृत्व पाहून काही पालकांना आपल्या भावना अनावर झाल्या. त्यापैकी काही महिला पालकांचा कंठ दाटून आला होता.

या धनादेशाचे वितरण शहर सरचिटणीस आणि माजी नगरसेवक दीपकजी पोटे, कोथरूड मंडळ अध्यक्ष पुनीतजी जोशी, शुभारंभ कार्यालयाचे व्यवस्थापक समीरजी देशपांडे आणि मल्लखांब प्रशिक्षक रविंद्र पेठे सर यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव राज तांबोळी यांनी केले. तर संस्थेच्या अध्यक्ष प्रा.अनुराधा येडके यांनी आभार मानले.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *