Blood donation camp organized by BJP Ward No. 23 and Rudratej Pratishthan.
Bharatiya Janata Party Ward No. 23 and Rudratej Pratishthan have organized a blood donation camp on 9th May 2021. The camp will be inaugurated by Mayor Murlidhar Mohol. Bharatiya Janata Party’s Pune city president Jagdish Mulik will be the chief guest.
This camp has been organized at Shiva Mandir, Rudratej Pratishthan, Tukai Tekdi, Kalepadal, next to Swami Samarth Kendra on Sunday 9th May 2021 from 8 am to 3 am. Corporator Maruti Aba Tupe and Amit Gaikwad took the initiative in organizing this camp. The organizers have appealed to the people between the ages of 18 and 50 to donate blood before getting vaccinated.
भाजप प्रभाग क्र २३ व रुद्रतेज प्रतिष्ठान यांच्याकडून रक्तदान शिबीराचे आयोजन .
भारतीय जनता पार्टी प्रभाग क्र २३ व रुद्रतेज प्रतिष्ठान यांच्याकडून दिनांक ९ मे २०२१ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उदघाटन पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे. भारतीय जनता पार्टीचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
हे शिबीर शिवमंदिर, रुद्रतेज प्रतिष्ठान, तुकाई टेकडी , काळेपडळ, स्वामी समर्थ केंद्राच्या शेजारी येथे रविवार दिनांक ९ मे २०२१ रोजी सकाळी ८ थे ३ पर्यंत आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर भरविण्यात नगरसेवक मारुती आबा तुपे आणि अमित गायकवाड यांनी पुढाकार घेतला. १८ ते ५० वयोगटातील वक्तींनी लस घेण्यापूर्वी रक्तदान करावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
Micro restricted areas began to decline, dropping by 178 in 10 days
The number of micro restricted areas started decreasing, the number of restricted areas decreased by 178 in 10 days. The number of areas in the city has decreased by 178. However, there are still 314 such areas in the city. Corona buildings with more than 5 patients and societies with more than 20 patients are being declared as micro restricted areas in the city. For the last three weeks in a row, 100 new micro-restricted areas were being declared in the city every week. However, during the week of April 17 to 24, the number has come down. As of April 16, the city had a total of 497 micro-restricted areas. There was no increase in that. As a result, on April 26, 5 areas were reduced to 492. From April 26 to May 6, the number of these areas has come down to 314. It includes 75 buildings, 174 societies and 65 other areas.
The most restricted area is the Hadapsar-Mundhwa area.
The most micro restricted area in the city is within the limits of Hadapsar Mundhwa Regional Office and this number is 62. The Dhankawadi-Sahakarnagar Regional Office is at the second position with 56 seats. The regional offices with less than ten restricted areas include Sinhagad Road, Kondhwa-Yewalewadi, Kothrud-Bavdhan, Bhawanipeth, Vishrambaug Wada, and Dhole Patil Regional Offices.
The East Haveli area near Hadapsar need to be a restricted area
The spread of corona in the eastern mansion is growing rapidly. As a result, many villagers have lost their lives. Experts in the area are demanding strict lockdown and enforcement of rules in all the villages in East Haveli. The death toll has risen in Kadam Wak Wasti, Loni Kalbhor, Theur, Kunjirwadi, Naigaon, Koregaon Mool, Sortapwadi, Tikekarwadi, Alandi Mhatobachi, Uruli Kanchan, and surrounding villages in East Haveli. In some villages, three to four civilians die every day.
The youth in the East Haveli has been found in the clutches of Corona and the death season due to Corona continues in many villages. In the former mansion, Karona’s grip is seen tightening. Many middle-aged young people in some villages have fallen victim to Corona. Many in the East Haveli in the last few days. Prominent citizens and many budding young entrepreneurs have been victimized by Corona.
सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र होऊ लागले कमी, १० दिवसांत प्रतिबंधित क्षेत्राची संख्या १७८ने झाली कमी.
शहरातील क्षेत्रांची संख्या तब्बल १७८ने कमी झाली आहे. तरही शहरात अद्याप या क्षेत्रांची संख्या ३१४ आहे. शहरात करोनाचे ५ पेक्षा अधिक रुग्ण सापडलेल्या इमारती आणि २० पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या सोसायट्या सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात येत आहे. मागील सलग तीन आठवडे शहरात प्रत्येक आठवड्याला नव्याने १०० सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केली जात होती. मात्र, १७ ते २४ एप्रिल या आठवड्यात ही क्षेत्रसंख्या कमी झाल्याचे समोर आले आहे. १६ एप्रिलला शहरात एकूण ४९७ सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र होती. त्या कोणतीही वाढ झाली नाही. त्यामुळे २६ एप्रीलला ५ क्षेत्र कमी होऊन त्यांची संख्या ४९२ होती. तर २६ एप्रील ते ६ मे या कालावधीत या क्षेत्रांची संख्या आणखी कमी होऊन ३१४ वर आली आहे. त्यात, ७५ इमारती, १७४ सोसायटया तर ६५ इतर क्षेत्रांचा समावेश असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागकडून स्पष्ट करण्यात आले.
हडपसर-मुंढवा भागात सर्वाधिक प्रतिबंधित क्षेत्र. शहरात सर्वाधिक सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र हडपसर मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत असून ही संख्या ६२ आहे. तर धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय दुसऱ्या क्रमांकावर असून त्या ठिकाणची संख्या ५६ आहे. तर दहा पेक्षा कमी प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सिंहगड रस्ता, कोंढवा- येवलेवाडी, कोथरूड- बावधन, भवानी पेठ, विश्रामबागवाडा तसेच ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाचा समावेश आहे.
पूर्व हवेलीत आहे कडक निर्बंधाची गरज.
पूर्व हवेलीतील करोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. त्यामुळे अनेक गावातील नागरिकांचा बळी गेला आहे. यामुळे पूर्व हवेलीतील सर्वच गावांमध्ये कडक लॉकडाऊन व नियमांची अंमलबजावणी करण्याची गरज आहे, अशी मागणी या भागातील जाणकारांकडून केली जात आहे. पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, थेऊर, कुंजीरवाडी, नायगाव, कोरेगाव मूळ, सोरतापवाडी, टिळेकरवाडी, आळंदी म्हातोबाची, उरुळी कांचन व परिसरातील गावांमध्ये कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. काही गावांमध्ये तर दिवसाला तीन ते चार नागरिक मृत्युमुखी पडले आहेत.
हवेलीतील तरुणाई कोरोनाच्या विळख्यात सापडली असून अनेक गावांमध्ये कोरोनामुळे मृत्यूचे सत्र सुरूच आहे. पूर्व हवेलीत कोरोनाचा विळखा घट्ट होताना दिसत आहे. काही गावांमधील अनेक मध्यमवयीन तरुण करोनाचे बळी ठरल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत पूर्व हवेलीतील अनेक प्रतिष्ठित नागरिक व अनेक होतकरू तरुण उद्योजकांचा करोनाने बळी घेतला आहे..
Prashant Jagtap appointed as NCP’s city president.
Letter of appointment given by Deputy Chief Minister Ajit Pawar. The NCP has appointed former mayor Prashant Jagtap as the city president ahead of the municipal elections. Former city president Chetan Tupe had resigned last week saying he needed to make time for the Hadapsar assembly constituency. After that, Jagtap’s name was sealed by the party. State Deputy Chief Minister Ajit Pawar handed over the appointment letter in Pune on Friday. State President Jayant Patil appointed Jagtap.
I have been doing social and political work with the NCP in mind. The responsibility given by the party today will be faithfully fulfilled and I will give priority to increasing the organization and helping the citizens more through the Corona epidemic of the year.
Prashant Jagtap. City President Nationalist Congress Party, Pune
NCP will contest the municipal elections under the leadership of Jagtap. After the end of his tenure as mayor, Jagtap had announced that he would not take up any post in the municipal corporation and would give time for the party. After four years, the party has given him the responsibility of the city president. The NCP had invited applications for the post of city president last year. Some office-bearers including former mayor Dhanakwade, former house leader Subhash Jagtap, and Prashant Jagtap were interested in it, however, the responsibility of Pune NCP City President was given to Prashant Jagtap.
राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष पदी प्रशांत जगताप .
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले नियुक्तीचे पत्र. महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस कडून शहराध्यक्षपदी माजी महापौर प्रशांत जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी मागील आठवड्यात हडपसर विधानसभा मतदार संघासाठी वेळ देणे आवश्यक असल्याचे सांगत शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर पक्षाकडून जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पुण्यात नियुक्तीचे पत्र दिले . प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जगताप यांची नियुक्ती केली . जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी महापालिका निवडणूक लढणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारातून मी आजवर सामाजिक आणि राजकीय कार्य करत आलो आहे. आज पक्षाने दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पडणार असून पक्ष संघटन वाढवण्याबरोबरच सालच्या कोरोना महामारीत पक्ष्याच्या माध्यमातून नागरिकांना अधिकाधिक मदत करता येईल, याला प्राध्यान्य देणार आहे.
प्रशांत जगताप . शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पुणे
महापौर पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर जगताप यांनी या पुढे महापालिकेतील कोणतेही पद घेणार नसल्याचे तसेच पक्षासाठी वेळ देणार असल्याचे जाहीर केले होते . त्यानंतर पक्षाकडून तब्बल चार वर्षांनी यांच्याकडे शहराध्यक्षपदी जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कडून मागील वर्षी शहराध्यक्ष पदासाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यात माजी महापौर धनकवडे , माजी सभागृहनेते सुभाष जगताप, प्रशांत जगताप यांच्यासह काही पदाधिकारी इच्छुक होते. मात्र त्यात प्रशांत जगताप यांची वर्णी लागली आहे.
Centre revises policy, COVID-19 positive test report no longer mandatory for admission to hospital.
A test report confirming the coronavirus infection is no longer mandatory for admission of patients to the COVID-dedicated medical facilities, the Union Health Ministry said.
“No patient will be refused services for any reason. This includes medications such as oxygen or essential drugs and even if the patient belongs to a different city,” the Union Health Ministry said. The Centre on May 8 revised the national policy for admission of COVID-19 patients to the hospitals.
“Requirement of a positive test for COVID-19 virus is not mandatory for admission to a COVID health facility. A suspect case shall be admitted to the suspect ward of CCC (COVID Care Center), DCHC (Dedicated COVID Health Centre), or DHC (Dedicated COVID Hospital) as the case may be,” said a statement issued by the Health Ministry. As per the government’s guidelines, the patients with mild symptoms are to be admitted at the CCC, those with moderate symptoms at DCHC and those clinically assigned as severely infected are to be treated at the DHC.
The Centre, while announcing the revision in hospital admission policy, said no patient will be refused services for any reason. “This includes medications such as oxygen or essential drugs even if the patient belongs to a different city,” it stated. No patient shall be refused admission on the ground that he/she is not able to produce a valid identity card that does not belong to the city where the hospital is located, the Health Ministry further added. The Centre, however, underlined that admissions to the hospital must be based on need. “It should be ensured that beds are not occupied by persons who do not need hospitalization,” The change in hospital admission policy for COVID-19 patients comes amid a sharp spike in virus transmission rate across the country, which has stressed the labs conducting the RT-PCR and rapid antigen tests. Furthermore, experts are also claiming that the mutated coronavirus requires a CT scan to be detected in certain cases.
The Health Ministry statement noted that the chief secretaries of all states and union territories are required to incorporate the revised policy “within three days”. “This patient-centric measure aims to ensure a prompt, effective, and comprehensive treatment of patients suffering from COVID-19,” it added.
केंद्राने धोरण सुधारले, कोविड -१९ पॉझिटिव्ह चाचणी अहवाल यापुढे रुग्णालयात प्रवेश घेण्यास अनिवार्य नाही.
कोरोना संसर्गाची पुष्टी करणारा चाचणी अहवाल यापुढे कोविड-समर्पित वैद्यकीय सुविधांमध्ये रूग्णांच्या प्रवेशासाठी अनिवार्य नाही, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, “कोणत्याही रुग्णाला कोणत्याही कारणास्तव सेवा नाकारली जाणार नाही. यामध्ये ऑक्सिजन किंवा आवश्यक औषधे यासारख्या औषधे समाविष्ट आहेत आणि जरी रुग्ण वेगळ्या शहराचा असेल,” केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले. कोविड -१९ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याच्या राष्ट्रीय धोरणात केंद्र सरकारने 8 मे रोजी सुधारणा केली.
“कोविड -१९ विषाणूची सकारात्मक चाचणी घेण्याची आवश्यकता कोविड आरोग्य सुविधेत प्रवेश घेण्यास अनिवार्य नाही. संशयित प्रकरण सीसीसी (कोविड केअर सेंटर), डीसीएचसी (डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर) किंवा डीएचसीच्या संशयित वॉर्डात दाखल केले जाईल.” “केस समर्पित कोविड हॉस्पिटल) असू शकते,” असे आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णांना सीसीसी येथे दाखल करावयाचे आहे, ज्यांना डीसीएचसीमध्ये मध्यम लक्षणे आहेत आणि गंभीरपणे संसर्गग्रस्त म्हणून नियुक्त केलेल्या रूग्णांवर डीएचसीमध्ये उपचार करावेत.
केंद्राने रुग्णालयातील प्रवेश धोरणात सुधारणा करण्याची घोषणा करताना म्हटले आहे की कोणत्याही रुग्णाला कोणत्याही कारणास्तव सेवा नाकारली जाणार नाही. “यात रुग्ण वेगवेगळ्या शहराचा असला तरीही ऑक्सिजन किंवा आवश्यक औषधे यासारख्या औषधे समाविष्ट आहेत,” असे नमूद केले आहे. आरोग्य मंत्रालयाने पुढे म्हटले आहे की, ज्या रुग्णास रुग्णालय आहे त्या शहराचे नसलेले वैध ओळखपत्र तयार करण्यास सक्षम नसल्यामुळे कोणत्याही रुग्णांना प्रवेश नाकारला जाऊ शकत नाही. केंद्राने मात्र अधोरेखित केले की रुग्णालयात दाखल करणे गरजेनुसार असले पाहिजे. “हे सुनिश्चित केले पाहिजे की ज्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नाही अशा व्यक्तींनी बेड ताब्यात घेतलेले नाहीत .”
कोविड -१९ मधील रूग्णांच्या रूग्णालयात प्रवेश धोरणामध्ये बदल हा विषाणूच्या संक्रमणाच्या दरात जोरदार वाढ होत आहे. यामुळे आरटी-पीसीआर आणि जलद प्रतिजैविक चाचण्या घेण्यात आलेल्या लॅबवर ताण आला आहे. शिवाय, तज्ञ असेही म्हणत आहेत की बदललेल्या कोरोनाव्हायरसला काही विशिष्ट प्रकरणांमध्ये सीटी स्कॅन शोधणे आवश्यक आहे. आरोग्य मंत्रालयाच्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांनी “तीन दिवसात” सुधारित धोरण समाविष्ट करणे आवश्यक आहे. “हे रुग्ण-केंद्रित उपाय कोविड -१९ पासून ग्रस्त रूग्णांवर त्वरित, प्रभावी आणि सर्वसमावेशक उपचारांची खात्री करणे हे आहे.”