Applications for the DIPLOMA examination in July-August must be submitted by May 12.
The examinations for the Engineering Diploma conducted by the Maharashtra State Board of Technical Education will be held in July-August. Students will be able to fill up the application form by May 12, the board said. The summer examinations for various diploma and short-term courses conducted by the Maharashtra State Board of Technical Education (MSBTE) will be held in July-August.
The online application schedule for the exams has been announced and students are urged to apply on time. Examination forms have been made available to the students in the student login on the website through MSBTE. Students are required to fill in their own mobile number and email ID while filling up the application form, as the mobile number filled in the form and information about the exam will be sent on the e-mail ID.
पदविका अभ्यासक्रमाच्या (DIPLOMA) परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये,बारा मे पर्यंत अर्ज भरणे आवश्यक.
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळातर्फे मंडळामार्फत घेतल्या जाणाऱ्या अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम म्हणजेच ( DIPLOMA)च्या परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये होणार आहेत. विद्यार्थ्यांना बारा मे पर्यंत अर्ज भरता येणार आहे, असे मंडळामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे . महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ(MSBTE ) मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध डिप्लोमा व अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांच्या उन्हाळी परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये होणार आहे. या परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचे वेळापत्रक जाहीर झाले असून त्यानुसार विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज करावेत असे आवाहन केले आहे. एम एस बी टी ई मार्फत संकेतस्थळावरील स्टुडंट लॉग इन मध्ये विद्यार्थ्यांसाठी परीक्षा अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी हा अर्ज भरताना स्वतःचा मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी भरणे गरजेचे आहे, विद्यार्थ्यांनी फॉर्म (FORM ) मध्ये भरलेला मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडीवर परीक्षा विषयी माहिती पाठवली जाणार असल्याने या दोन्ही गोष्टी विद्यार्थ्यांनी अचूक पणे नमूद करणे आवश्यक आहे.
Scholarship exams postponed. New dates for the scholarship exam will be announced soon.
The Maharashtra State Examination Council has postponed the scholarship examinations for Class V and VIII. New dates for the scholarship exam will be announced soon. Teachers’ unions are protesting against the exams being held in May due to the corona epidemic. Teachers’ unions are demanding postponement of scholarship examinations. The annual scholarship examination was scheduled to be held in April on the backdrop of Corona the examination was postponed to May 30.
The scholarship examination for Class V to VIII scheduled for May 23 has been postponed. If the examination is not canceled, the examination will be postponed and a new date will be announced soon and an official order will be issued by Monday.
Tukaram Supe. Commissioner Maharashtra Examination Council.
The examination council has made all the preparations for the examination and has started printing the question papers. But Commissioner of Maharashtra State Examination Council, Supe has sent a proposal to the Additional Secretary, Department of School Education, asking that if the situation is unfavorable in Corona’s background, it would be appropriate to postpone the examination instead of canceling it. Accordingly, the examination will be postponed and soon next dates will be announced.
शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली, शिष्यवृत्ती परीक्षेच्या नवीन तारखा लवकरच जाहीर करणार .
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे . शिष्यवृत्ती परीक्षेच्या नवीन तारखा लवकरच झाहीर करण्यात येणार आहे. कोरोना महामारी मुळे या परीक्षा मे महिन्यात घ्यायला शिक्षक संघटनांकडून विरोध दर्शवला जात आहे . शिष्यवृत्ती परीक्षेला स्थगिती द्यावी, परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी शिक्षक संघटनांकडून होत आहे.
इयत्ता पाचवी ते आठवी ची 23 मे रोजी निश्चित केलेली शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे ही परीक्षा रद्द केली नाही तर तूर्तास पुढे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल तसेच याबाबत अधिकृत आदेश लवकरच काढण्यात येईल.
तुकाराम सुपे ,आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद .
दरवर्षी फेब्रुवारी होणारी शिष्यवृत्ती परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल मध्ये घेण्यात येणार होती मात्र ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून 23 मे रोजी ही परीक्षा घेण्याचा निर्णय ३० मार्चला घेण्यात आला. परीक्षा परिषदेकडून परीक्षा आयोजनाची पूर्ण तयारी झाली आहे , शिवाय प्रश्नपत्रिका छपाई सुरू झाली. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती प्रतिकूल असेल तर परीक्षा रद्द करण्याऐवजी पुढे ढकलणे उचित ठरेल अशा मागणीचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदचे आयुक्त सुपे यांनी शालेय शिक्षण विभागाचे अतिरिक्त सचिवाकडे पाठवला आहे . त्यानुसार लवकरच परीक्षा पुढे ढकलण्याची जाहीर केला जाणार आहे.