2 thousand 202 new patients across the country
देशभरात २ हजार २०२ नवे रुग्ण
नवी दिल्ली : गेल्या २४ तासात देशभरात २ हजार २०२ नवे रुग्ण आढळले . सध्या देशात १७ हजार ३१७ रुग्ण उपचाराधीन असून रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ७४ शतांश आहे. काल दिवसभरात २ हजार ५५० रुग्ण बरे झाले आहेत.
राज्यात आज कोविड-१९ च्या २५५ नव्या रुग्णांची नोंद झाली, १७५ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ७८ लाख ८० हजार ८४०जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी ७७ लाख ३१ हजार ४७६ रुग्ण बरे झाले. सध्या राज्यात १ हजार ५१८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
मुंबईत आज १५१नवे रुग्ण आढळले. आज १२२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. एका रुग्णाचा मृत्यू झाला असून मुंबईत सध्या ८८५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबईतला कोरोनामुक्तीचा दर ९८ टक्के असून, रुग्णदुपटीचा कालावधी ५ हजार ८५५ दिवसांवर आला आहे.
हडपसर न्युज ब्युरो