Admirable work by  Maruti Abba Tupe : Mayor Mohol on the occasion of blood donation camp.

Admirable work by  Maruti Abba Tupe : Mayor Mohol on the occasion of blood donation camp.

 Corporator Maruti Aba Tupe, along with community doctors, police, health, cleaners, and all frontline workers, has also risked his life during the Corona period. Mayor Muralidhar Mohol said that his work during the Corona period was commendable.

The blood donation camp was organized by Bharatiya Janata Party Ward No. 23 and Rudra Pratishthan. The camp was inaugurated by Mayor Mohol. 167 people donated blood despite the Corona period. Amit Gaikwad, Jeevan Jadhav, Nana Tupe, Sanjay Parikh, Mauli Kudle, Rahul Chowgule of Rudratej Pratishthan were present on this occasion.

मारुती आबांचे  कार्य कौतुकास्पद,  रक्तदान शिबिर प्रसंगी महापौर मोहोळ यांचे प्रतिपादन .

 कोरना  काळामध्ये समाजातील डॉक्टर, पोलीस , आरोग्य, सफाई कर्मचारी आणि सर्व फ्रन्टलाइन वर्कती  यांच्याबरोबर नगरसेवक मारुती आबा तुपे  यांनी देखील जीव धोक्यात घालून काम केले असून कोरोना काळातील आबांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले . 

भारतीय जनता पक्ष प्रभाग क्रमांक 23 व रुद्र प्रतिष्ठान च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  शिबिराचे उद्घाटन महापौर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले करोना काळ असूनही 167 जणांनी रक्तदान केले.  यावेळी रुद्रतेज प्रतिष्ठानचे अमित गायकवाड , जीवन जाधव , नाना तुपे ,  संजय पारीख  माऊली कुडले,  राहुल चौगुले आदी उपस्थित होते. 

Given the possibility of a third wave of the corona, hospitals should create all the necessary medical services for children.

     – Divisional Commissioner Saurabh Rao.

While Pune is facing the first and second waves of Corona, medical experts are predicting a third wave. In view of the possibility of infection in children in the third wave, all government and private hospitals in the district should set up all the necessary medical services and facilities for children, said Divisional Commissioner Saurabh Rao.

  A meeting of the Corona Core Committee was held at the Council Hall in Pune under the chairmanship of Divisional Commissioner Saurabh Rao. Pune Municipal Commissioner Vikram Kumar, Pimpri Chinchwad Municipal Commissioner Santosh Patil, Collector Dr. Rajesh Deshmukh, Additional Commissioner Rubel Agarwal, Zilla Parishad Chief Executive Officer AYUSH Prasad, Director of Health Dr. Archana Patil, Advisor to the Health Department and Dr. of the Task Force. Subhash Salunke, Dr.D. Dr. B. Kadam, District Surgeon Ashok Nandapurkar, District Health Officer Dr. Bhagwan Pawar, District Information Officer Yuvraj Patil, Head of Corona Testing Department of Sassoon Hospital Dr. Rajesh activists as well as superintendents, superintendents and chief doctors of various government and private hospitals in the district were present. 

     Divisional Commissioner Saurabh Rao said that various medical services are being provided by the administration for corona prevention in the Pune division. Hospitals need to take all necessary measures to provide appropriate treatment to children who are affected by the third wave of the corona. Doctors, nurses, paramedical staff have done their duty very well in the fight against Corona. He further appealed to all types of specialist doctors to provide services during the corona period. Rao did. 

  •  If children are infected with corona, consider setting up separate centers in hospitals for them
  •  Preparations are also required for post-covidar ailments
  •  More and more emphasis on covid vaccination
  •  Appeal to all types of specialist doctors to provide services during the corona period
  •  Parents should create awareness among children about the use of social distance, masks, sanitizers
  •  Psychiatrists and NGOs should work together to alleviate stress and fears caused by corona.

  Divisional Commissioner Saurabh Rao said that besides covid disease, efforts should also be made to provide treatment facilities for post-covid disease. He also appealed to be vigilant against infectious diseases that occur during monsoons. Parents should create awareness among the children to take precautions like the use of masks, sanitizers, use of social distance, etc. for corona prevention, appealed Shri. Rao did. 

Dr. Sassoon’s covid test department. Rajesh Karyakarte informed about the facilities set up in Sassoon. 

Dr. Dinanath Mangeshkar Hospital. Sanjay Jog said that most of the time coronary patients are being treated with remedicavir. The treatment method needs to be followed as per the guidelines of the health department. 

Dr. Sanjay Lalvani of Bharti Hospital said that in view of the possibility of a third wave, it is necessary to set up special wards for children in hospitals. In addition, pediatricians, nurses, and medicines need to be prepared. In addition, a separate room will have to be set up for mothers with small children, he said.

 UNICEF Representative Praveen Pawar said there was a need for participatory awareness programs to reduce the risk of covid among the people in the third wave.

Director Dr. Archana Patil, Task Force’s Dr. Subhash Salunke D. B. Kadam provided information on the symptoms of the first and second wave of the corona, possible third wave, remedies, treatment in mucormycosis, etc. He also said that if medical services were provided to the citizens and children in the rural areas in the same area, there would be no stress on the urban hospitals.

The meeting was attended by the chief doctors of various hospitals in the district.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता  रुग्णालयांनी बालकांसाठी आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सेवा- सुविधा निर्माण कराव्यात. 

     – विभागीय आयुक्त सौरभ राव.

 कोरोनामुळे निर्माण झालेला ताण तणाव व भीती दूर करण्यासाठी मनसोपचार तज्ञ, स्वयंसेवी संस्थांनी सहकार्य करावे

पुणे, कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा सामना करताना वैद्यकीय तज्ञांकडून तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांमध्ये संसर्ग आढळून येण्याची शक्यता गृहीत धरुन जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांनी लहान बालकांसाठी आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सेवा- सुविधा गतीने निर्माण कराव्यात, अशा सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केल्या.

  पुण्यातील कौन्सिल हॉल येथे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना कोअर कमिटीची बैठक घेण्यात आली. यावेळी पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त संतोष पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाच्या संचालक डॉ.अर्चना पाटील, आरोग्य विभागाचे सल्लागार तथा टास्क फोर्सचे डॉ. सुभाष साळुंके, डॉ.डी. बी.कदम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भगवान पवार, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, ससून रुग्णालयाच्या कोरोना चाचणी विभागाचे प्रमुख डॉ. राजेश कार्यकर्ते तसेच जिल्ह्यातील विविध शासकीय व खासगी रुग्णालयाचे अधिष्ठाता, अधीक्षक, प्रमुख डॉक्टर उपस्थित होते. 

 लहान मुले कोरोनाने बाधित झाल्यास त्यांच्यासाठी रुग्णालयांमध्ये स्वतंत्र केंद्र तयार करण्याबाबत विचार करावा.

 कोविड नंतर उद्भवणाऱ्या  आजरा बाबतही तयारी आवश्यक.

 कोविड लसीकरणावर अधिकाधिक भर.

 सर्व प्रकारच्या विशेषज्ञ डॉक्टरांनी कोरोना काळात सेवा देण्याचे आवाहन.

सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझरच्या वापराबाबत पालकांनी बालकांमध्ये जागृती करावी.

 

विभागीय आयुक्त सौरभ राव.

     विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले, पुणे विभागात कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनाच्या वतीने विविध वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये बालके बाधित झाल्यास त्यांच्यावर योग्य उपचार उपलब्ध करुन देण्यासाठी रुग्णालयांनी आवश्यक त्या सर्व उपाययोजना निर्माण करणे आवश्यक आहे.  कोरोना विरुद्धच्या लढ्यात डॉक्टर, नर्सेस, पॅरा मेडिकल स्टाफ ने आपले कर्तव्य खूप चांगल्या पद्धतीने बजावले आहे. या पुढे देखील सर्व प्रकारच्या विशेषज्ञ डॉक्टरांनी कोरोना काळात सेवा द्यावी, असे आवाहन श्री. राव यांनी केले. 

   विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले, कोविड बाजाराबरोबरच कोविड पश्चात उद्भवणाऱ्या आजारामध्ये देखील उपचार सुविधा देण्यासाठी प्रयत्न करावेत. त्याचबरोबर पावसाळ्यात होणाऱ्या संसर्गजन्य आजाराबाबतही दक्ष राहावे, असे आवाहन त्यांनी केले. कोरोना प्रतिबंधासाठी  मास्क, सॅनिटायझरचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचा वापर आदी दक्षता मुलांनी घ्यावी, यासाठी पालकांनी बालकांमध्ये जागृती करावी, असे आवाहन यावेळी श्री. राव यांनी केले. 

ससूनचे कोविड चाचणी विभागाचे डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी ससून मध्ये तयार करण्यात आलेल्या सुविधांबाबत माहिती दिली. 

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. संजय जोग म्हणाले, बऱ्याचदा कोरोनाच्या रुग्णांना सरसकट रेमडेसीविर चा वापर केला जात आहे. आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार पद्धतीचे पालन होणे गरजेचे आहे. 

भारती हॉस्पिटल चे डॉ.संजय ललवाणी म्हणाले, तिसऱ्या लाटेची शक्यता पाहून रुग्णालयांमध्ये लहान मुलांसाठी विशेष वॉर्ड तयार करणे आवश्यक आहे. याबरोबरच बालरोगतज्ञ, नर्स, औषधसाठा तयार ठेवणे गरजेचे आहे. याबरोबरच लहान बालकांसोबत येणाऱ्या मातांसाठी वेगळा कक्ष निर्माण करावा लागेल, असे सांगितले.

 युनिसेफ चे प्रतिनिधी प्रवीण पवार यांनी तिसऱ्या लाटेमधील लोकांमधील  कोविडचा धोका कमी करण्यासाठी सहभाग्य पध्दतीने जाणीवजागृती कार्यक्रम करणे गरजेचे असल्याचे सांगितले.

बैठकीत संचालक डॉ.अर्चना पाटील, टास्क फोर्स चे डॉ. सुभाष साळुंके, डॉ. डी. बी.कदम यांनी कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या लाटेतील लक्षणे, संभाव्य तिसरी लाट, उपाययोजना, म्युकर मायकोसिस मधील उपचार, आदी बाबतीत माहिती दिली. तसेच ग्रामीण भागातील नागरिक व बालकांना त्याच भागात वैद्यकीय सेवा मिळवून दिल्यास शहरातील रुग्णालयावर ताण येणार नाही असे सांगितले.

बैठकीला जिल्ह्यातील विविध रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर उपस्थित होते.

Strict action will be taken against those who roam without any reason. Strict enforcement of rules after 12 noon: Police Commissioner Amitabh Gupta.

Strict enforcement of rules has been introduced in the city to stop corona infection, so if people have important work to do, it should be completed by eleven o’clock in the morning. The rules will be strictly enforced after the afternoon rain. Police Commissioner Amitabh Gupta has warned that action will be taken if any violation is found.
The effects of coronary heart disease are beginning to show. The number of Karuna patients has been declining since the last few days, but again the streets are crowded. So strict enforcement has been going on for four days.

Now, more rules will be enforced after the afternoon rains. Crimes are being registered by taking action if it is observed to leave without any reason.
City police have now extended the scope of the blockade, allowing citizens to purchase essential items until 11 a.m., even though citizens should reduce the use of vehicles in their area. In the morning, the citizens go out for various reasons, which sometimes leads to disputes between the police and the citizens on the streets. Police Commissioner Amitabh Gupta said that an inquiry has been ordered into every citizen who has been on the streets since noon.

दुपारी बारानंतर नियम कडक.  विनाकारण फिरणाऱ्यांवर तीव्र  कारवाई करणार :पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता . 

  शहरात कोरोना संसर्ग थांबविण्यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे, त्यामुळे लोकांनी महत्त्वाची कामे असेल तर ती सकाळी अकरा वाजता च्या आतच पूर्ण करावी.  दुपारी बारानंतर नियमांची कडक अंमलबजावणी  केली जाईल जाणार आहे.  नियमभंग केल्याचे आढळ्यास  कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिला आहे. 

 कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लागलं चे चांगले परिणाम दिसू लागले आहेत.  गेल्या काही दिवसात पासून करुणा रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे, मात्र पुन्हा रस्त्यावर गर्दी दिसत आहे.  त्यामुळे चार दिवसांपासून कडक अंमलबजावणी केली जात आहे.  

 आता दुपारी बारानंतर आणखी नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची नाका-बंदी दरम्यान कसून चौकशी करण्यात येत आहे.  विनाकारण  बाहेर पडण्याचे  निदर्शनास आल्यास  कारवाई  करून गुन्हे दाखल केले जात आहेत . 

शहर पोलिसांनी आता नाकाबंदी ची व्याप्ती वाढवली आहे नागरिकांनाअकरा वाजेपर्यंत अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मुभा दिली जात आहे, असे असले मोठ्या प्रमाणावर नागरिक बाहेर पडतात,  तरी  नागरिकांनी आपल्या परिसरात वाहनांचा वापर कमी करावा.  सकाळी नागरिक वेगवेगळी कारण सांगत बाहेर पडत असतात, त्यातून रस्त्यावर पोलिस आणि नागरिक यांच्यात काही वेळा वादाचे प्रसंग घडताना दिसतात.  त्यामुळे दुपारपासून रस्त्यावर आलेल्या प्रत्येक नागरिकाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे  पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले. 

 

Online inauguration of the expanded Covid Center of Daund Sub-District Hospital by Deputy Chief Minister Ajit Pawar.

The state health system, including doctors and nurses, is fighting with all its might to overcome the Corona crisis. The supply of oxygen, remedicative drugs should be maintained and all patients should be provided with the necessary treatment. The government has a role to play in vaccinating every citizen in the state to defeat Corona. Necessary funds have been provided for this. The Pune District Collector has been directed to immediately provide space in Pune for the plant of vaccine grower Bharat Biotech, informed Deputy Chief Minister and Guardian Minister of Pune Ajit Pawar today.

Will immediately provide space in Pune for Bharat Biotech’s plant;
Funds available for corona preventive vaccination
Deputy Chief Minister Ajit Pawar.

Deputy Chief Minister Ajit Pawar inaugurated the extended Dedicated Covid Center of Daund Sub-District Hospital online from the Committee Hall of the Deputy Chief Minister’s Office in the Ministry. MLA Rahul Kul, Medical Superintendent of Daund Sub-District Hospital Dr. Sangram Dange, Taluka Medical Officer Dr. Surekha Pol, Medical Superintendent of Yavat Dr. Shashikant Irwadkar (all through VC) was present on the occasion.

Deputy Chief Minister Ajit Pawar inaugurated the extended Dedicated Covid Center of Daund Sub-District Hospital online from the Committee Hall of the Deputy Chief Minister’s Office in the Ministry. He was talking at the time. MLA Rahul Kul, Medical Superintendent of Daund Sub-District Hospital Dr. Sangram Dange, Taluka Medical Officer Dr. Surekha Pol, Medical Superintendent of Yavat. Shashikant Irwadkar (all through VC) was present on the occasion.
Deputy Chief Minister Ajit Pawar said that complete planning has been done by the state government to expedite the immunization of corona. Necessary funds are available for vaccination. The Pune District Collector has been directed to provide space for the plant of Bharat Biotech Company in Pune. Planning is underway accordingly. That work will have to be done immediately.
Daund Sub-District Hospital has started an extended Dedicated Covid Center at Deulgaon Gada which has provided good quality healthcare facilities to the citizens of the area. We all want to face the Corona crisis together. Deputy Chief Minister Ajit Pawar appealed to the citizens to strictly follow the guidelines for defeating Corona.
MLA Rahul Kul thanked the state government and district administration for their full support and cooperation in the fight against Corona. The event was attended by office bearers and officers of various organizations in Daund taluka through VC.

दौंड उपजिल्हा रुग्णालयाच्या विस्तारित कोविड सेंटरचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन.

       कोरोना संकटावर मात करण्यासाठी डॉक्टर, नर्सेस आदींसह राज्याची आरोग्य यंत्रणा सर्वशक्तिनिशी लढत आहे. ऑक्सिजन, रेमडिसिव्हिर औषधांचा पुरवठा सुरळीत रहावे तसेच सर्व रुग्णांना आवश्यक उपचार मिळण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. कोरोनाला हरविण्यासाठी राज्यातील प्रत्येक नागरीकाला लस देण्याची सरकारची भूमिका आहे. त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली आहे. लसउत्पादक ‘भारत बायोटेक’च्या प्लॅन्टसाठी पुण्यात तातडीने जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिली. 

        दौंड उपजिल्हा रुग्णालयाच्या विस्तारीत डेडिकेटेड कोविड सेंटरचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहातून ऑनलाईन पद्धतीने केले. त्यावेळी ते बोलत होते. उद्घाटन कार्यक्रमाला आमदार राहूल कुल, दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संग्राम डांगे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा पोळ, यवतचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शशिकांत इरवाडकर (सर्वजण व्हीसीद्वारे)  आदी मान्यवर उपस्थित होते.

‘भारत बायोटेक’च्या प्लॅन्टसाठी पुण्यात तातडीने जागा देणार;

कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध  

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती.

 

दौंड उपजिल्हा रुग्णालयाच्या विस्तारीत डेडिकेटेड कोविड सेंटरचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहातून ऑनलाईन पद्धतीने केले. उदघाटन कार्यक्रमाला आमदार राहूल कुल, दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संग्राम डांगे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा पोळ, यवतचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शशिकांत इरवाडकर (सर्वजण व्हीसीद्वारे) आदी मान्यवर उपस्थित होते.

        उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले की, कोरोना प्रतिबंधक लसीकरण वेगाने पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. लसीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध आहे. भारत बायोटेक कंपनीच्या प्लॅन्टला पुण्यात जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पुणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार नियोजन सुरू आहे. ते कामही तातडीने मार्गी लागेल. 

           दौंड उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने देऊळगाव गाडा येथे विस्तारित डेडिकेटेड कोविड सेंटर सुरु केल्याने या परिसरातील नागरिकांना चांगल्या दर्जाची आरोग्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. आपण सर्वांनी एकजुटीने कोरोना संकटाचा सामना करायचा आहे. कोरोनाला हरविण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचे नागरीकांनी काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

          कोरोनाविरोधी लढ्यात राज्य शासन व जिल्हा प्रशासनाकडून संपूर्ण मदत, सहकार्य मिळत असल्याबद्दल आमदार राहूल कुल यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला दौंड तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी व्हीसीद्वारे पध्दतीने उपस्थित होते.  

Municipal Corporation takes action against unauthorized construction in Mundhwa police station area.

Pune Municipal Corporation Zone No. In order to take action against unauthorized construction at Ghorpadi, Bhairoba Nala (Anant Cinema to Sopanbagh) at Mundhwa Police Station in 4, 2650 sq. ft. Ft. The area was cleared.

In this action, S.No. 72A Shravastinagar street no. 4 and 5 Ghorpadi village Shri. Bashubai Ghodewale’s 600 sq. ft. Ft, S.No. 72A Shravastinagar street no. 4 and 5 Ghorpadi village Shri. Sunil Ahir Chaudhary’s 200 sq. ft. Ft, S.No. 72A Shravastinagar street no. Shri. Kabutarwale and others, Aman Riaz Kevnur’s 200 sq. ft. Ft, S.No. 72A Shravastinagar street no. Shri. Afsar Bhai and others owned 425 sq. ft. Ft, S.No. 72A Shravastinagar street no. Shri. Kiran Suryavanshi and others have 225 sq. ft. Ft, S.No. 64, near Tarabagh Society Sopan Baug. Ashipp Praful Amin and others, 1000 sq. ft. A total of 2650 sq. Ft. The foot area was cleared.

महापालिके द्वारे मुंढवा पोलीस स्टेशन भागात अनधिकृत बांधकामावर कारवाई.

पुणे महानगरपालिका झोन क्र. ४ मधील मुंढवा पोलीस स्टेशन येथील घोरपडी, भैरोबा नाला (अनंत सिनेमा ते सोपानबाग ) येथे अनधिकृत बांधकामावर कारवाई करणेत येऊन २६५० चौ. फुट. क्षेत्र मोकळे करण्यात आले.

सदरच्या कारवाईमध्ये घोरपडी, येथील स.नं. ७२ अ श्रावस्तीनगर गल्ली क्र. ४ व ५ घोरपडी गाव येथील श्री. बाशुबाई घोडेवाले यांचे ६०० चौ. फुट, स.नं. ७२ अ श्रावस्तीनगर गल्ली क्र. ४ व ५ घोरपडी गाव श्री. सुनील आहिर चौधरी यांचे २०० चौ. फुट,  स.नं. ७२ अ श्रावस्तीनगर गल्ली क्र. ४ व ५  येथील श्री. कबुतरवाले  व इतर, अमान रियाझ केवनुर यांचे २०० चौ. फुट, स.नं. ७२ अ श्रावस्तीनगर गल्ली क्र. ४ व ५  येथील श्री. अफसर भाई व इतर यांचे ४२५ चौ. फुट, स.नं. ७२ अ श्रावस्तीनगर गल्ली क्र. ४ व ५  येथील येथील श्री. किरण सूर्यवंशी व इतर यांचे २२५ चौ. फुट, स.नं. ६४, ताराबाग सोसायटी सोपानबाग जवळ श्री. आशीप्प प्रफुल आमीन व इतर ,यांचे १००० चौ. फुट  असे एकूण २६५० चौ. फुट क्षेत्र मोकळे करण्यात आले.

Farmers are requested to apply for seeds on the MahaDBT portal by 15th May.

 Pune 11: The facility to apply for the benefit of seeds under the title ‘Shetkari Yojana’ has been made available on the government’s MahaDBT portal till 15th May 2021. B. Bote has given through a press release.

Under this facility, the beneficiaries will be able to get seeds on soybean, paddy, tur, green gram, urad, maize, bajra etc. subsidy from the National Food Security Mission Scheme and it is mandatory for the farmers to apply through the portal. For the convenience of the farmers, an integrated computer system has been developed for the benefit of all the schemes from a single application to the actual benefit. Through this system, farmers are given the freedom to choose the matters of their choice and farmers have to apply for various matters related to agriculture.

The website of Maha-DBT Portal is https://mahadbtmahait.gov.in. The farmer scheme should be selected on this. Farmers can apply through their mobiles, computers, laptops, tablets, community service centers, Sangram Kendras in Gram Panchayats, etc. by visiting the above website. All farmers wishing to register as ‘Individual Beneficiaries’ will have to verify their Aadhaar number on this website. Users who do not have an Aadhar number should first go to the Aadhar registration center and register for the scheme by entering the registration number in the portal. Before distributing the grant to such applicants, they will have to register and certify the Aadhaar number in the portal, otherwise, the grant will not be distributed to them. Farmers can avail the help of the nearest Collective Service Center for this work and if there is any technical problem, they should contact helpdeskdbtfarmer@gmail.com or 020-25511479, appealed the District Superintendent of Agriculture, Pune.

महाडीबीटी पोर्टलवर बियाणांसाठी शेतक-यांनी १५ मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन.

 पुणे दि. ११ : शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना’ या शीर्षकांतर्गत बियाणे या घटकाचा लाभ घेण्यासाठी दिनांक १५ मे २०२१ पर्यंत अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी. बी. बोटे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

या सुविधा अंतर्गत लाभार्थींनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान योजनेतील सोया, भात, तूर, मूग,  उडीद, मका, बाजरी इत्यादी अनुदानावर बियाणे उपलब्ध होणार असून पोर्टलद्वारे अर्ज करणे शेतक-यांना बंधनकारक आहे. शेतक-यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ एका अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीद्वारे शेतक-यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून शेतक-यांनी शेती निगडीत विविध बाबींकरिता अर्ज करावयाचा आहे.

महा-डीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in हे संकेतस्थळ आहे. यावरील शेतकरी योजना हा पर्याय निवडावा. शेतकरी स्वत:च्या मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र, ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इत्यादी माध्यमातून वरील संकेतस्थळावर जाऊन अर्ज करु शकतील. ‘वैयक्तिक लाभार्थी’ म्हणून नोंदणी करु इच्छिणा-या सर्व शेतक-यांना त्यांचा आधार क्रमांक या संकेतस्थळावर प्रमाणित करुन घ्यावा लागेल. ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन नोंदणी करावी व तो नोंदणी क्रमांक पोर्टलमध्ये नमूद करुन त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल. अशा अर्जदारांना अनुदान वितरीत करण्यापूर्वी पोर्टलमध्ये त्यांना आधार क्रमांक नोंदणीकृत करुन प्रमाणित करुन घ्यावा लागेल, त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही. शेतकरी या कामासाठी आपल्या जवळच्या सामूहिक सेवा केंद्राची मदत घेऊ शकतात तसेच कोणतीही तांत्रिक अडचण असल्यास helpdeskdbtfarmer@gmail.com या ई-मेल व किंवा ०२०-२५५११४७९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे यांनी केले आहे.

 

For the work of incremental water supply scheme of Solapur city, The Department of Water Resources should issue the required No objection certificates.

The decision in a meeting chaired by Deputy Chief Minister Ajit Pawar

         In order to solve the water problem of Solapur city, the Water Resources Department should immediately issue the ‘No Certificate’ required by the Water Resources Department and a committee of senior officers should be set up to take a decision regarding the recovery of arrears from the Water Resources Department. Came.

          A meeting was held at the Deputy Chief Minister’s Committee Hall under the chairmanship of Deputy Chief Minister Ajit Pawar to review the work of Solapur city’s augmented water supply scheme under the ‘Smart City’ campaign. The meeting was attended by Water Resources Minister Jayant Patil, Urban Development Minister Eknath Shinde (via VC), Solapur Guardian Minister Dattatraya Bharane, Solapur Mayor Shrikanchana Yannam (via VC), MLA Praniti Shinde (via VC), former Mayor Corporator Mahesh Kothe (via VC) and NMC members and officials.

           Under the ‘Smart City’ scheme for the city of Solapur, the Municipal Corporation is laying a 110 km long aqueduct supplying 110 MLD of water from the Ujani Dam. This scheme is important for the smooth water supply of Solapur city. A decision was taken in a meeting chaired by Deputy Chief Minister Ajit Pawar that the ‘Naharkat Certificates’ required by the Water Resources Department should be issued immediately to expedite the work of this scheme.

Municipal Corporation should sign a water license agreement with the Water Resources Department. The compensation paid to the farmers for laying the aqueduct under this scheme should be revised. It was decided in the meeting that a decision should be taken by setting up a committee of senior officers regarding the arrears of the water resources department. Deputy Chief Minister Ajit Pawar instructed to expedite the work of the water supply scheme.

सोलापूर शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी जलसंपदा विभागाने आवश्यक ‘ना हरकत प्रमाणपत्रे’ द्यावीत. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय .

         सोलापूर शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी महत्वाच्या सोलापूर महापालिकेच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु राहण्यासाठी जलसंपदा विभागाकडून आवश्यक असणारी ‘ना हरकत प्रमाणपत्रे’ तातडीने देण्यात यावी तसेच महापालिकेकडील जलसंपदा विभागाच्या थकीत वसूलीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन करावी, असा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. 

          ‘स्मार्ट सिटी’ अभियानांतर्गत सोलापूर शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील उपमुख्यमंत्र्याच्या समिती सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला जलसंपदा मंत्री जयंत पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (व्हिसीद्वारे), सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, सोलापूरच्या महापौर श्रीकांचना यन्नम (व्हिसीद्वारे), आमदार प्रणिती शिंदे (व्हिसीद्वारे), माजी महापौर नगरसेवक महेश कोठे (व्हिसीद्वारे) तसेच महापालिका सदस्य व अधिकारी उपस्थित होते. 

           सोलापूर शहरासाठी ‘स्मार्ट सिटी’ योजनेंतर्गत महापालिकेच्यावतीने उजनी धरणावरुन 110 एमएलडी पाणीपुरवठा करणारी 110 किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकण्यात येत आहे. सोलापूर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी ही योजना महत्वाची आहे. या योजनेचे काम वेगाने होण्यासाठी जलसंपदा विभागाकडून आवश्यक असणारे ‘नाहरकत प्रमाणपत्रे’ तातडीने देण्यात यावीत, असा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. 

महापालिकेने जलसंपदा विभागासोबत पाणी परवाना करारनामा करुन घ्यावा. या योजनेंतर्गत जलवाहिनी टाकण्यासाठी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या नुकसानभरपाईचा फेरआढावा घेण्यात यावा. महापालिकेकडून जलसंपदा विभागाच्या थकबाकीसंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन करुन निर्णय घेण्यात यावा, असे बैठकीत ठरविण्यात आले. पाणीपुरवठा योजनेचे काम वेगाने करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *