The 21st century will be an age of information and IIT Mumbai is called upon to play an important role in it
एकविसावं शतक हे माहितीचं युग ठरणार असून, त्यात महत्वाची भूमिका बजावण्याचं आयआयटी मुंबईला आवाहन
मुंबई: एकविसावं शतक हे माहितीचं युग ठरणार असून, त्यात आयआयटी मुंबई अर्थात भारतीय तंत्रज्ञान संस्थेला महत्वाची भूमिका बजावावी लागणार आहे, असं केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे.
आयआयटी मुंबईच्या नव्यान बांधलेल्या वसतीगृहाचं उद्घाटन आज प्रधान यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. माहितीवर आधारीत अर्थव्यवस्था, तसंच सेवा क्षेत्रावर आधारीत अर्थव्यवस्था हे आजचं वास्तव आहे.
२१व्या शतकातल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची क्षमता असलेल्या मोजक्या शैक्षणिक संस्थामध्ये आयआयटी मुंबईचा समावेश होतो. या संस्थेनं अडीच कोटी कर्मचाऱ्यांसाठी रोजगाराची संधी निर्माण केली. ही सुखवणारी बाब आहे. इथून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांनी कर्मचारी होण्यापेक्षा उद्योजक होऊन, इतरांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न करावे, असं ते म्हणाले. ऊर्जेचं समान वाटप होणं आवश्यक असून, नवी ऊर्जा भारतकेंद्री असली पाहिजे, असं प्रतिपादन प्रधान यांनी केलं.
आग्नेय आशिया आणि मध्य आशिया आणि आखिती देशांमध्ये जगातली दोन तृतीयांश लोकसंख्या राहते. हे सर्वजण युरोप किंवा अमेरिकेकडे नव्हे, तर भारताकडे त्यांचा आदर्श म्हणून पाहतात, असं त्यांनी सांगितलं.
Hadapsar News Bureau