NIA offers 25 lakh reward for information on Dawood Ibrahim
दाऊद इब्राहिमची माहिती देणाऱ्यांना एनआयएचं २५ लाखांचं बक्षीस
मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणेनं कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिमवर २५ लाख रुपयांचं बक्षीस लावलं आहे. दाऊदचा हस्तक छोटा शकील वरही एनआयएनं २० लाख रुपयांचं बक्षीस लावलं आहे. त्यांच्या आणखी ३ हस्तकांवर प्रत्येकी १५ लाख रुपयांचं बक्षीस लावण्यात आलं असल्याचं एनआयएनं सांगितलं आहे.
तपास एजन्सीने इब्राहिमचा जवळचा सहकारी शकील शेख उर्फ छोटा शकील याच्यावर 20 लाख रुपये आणि सहकारी हाजी अनीस उर्फ अनीस इब्राहिम शेख, जावेद पटेल उर्फ जावेद चिकना आणि इब्राहिम मुश्ताक अब्दुल रज्जाक मेमन उर्फ टायगर मेमन, यांच्यावर प्रत्येकी 15 लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.
हे सर्वजण 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील वॉन्टेड आरोपी आहेत. एजन्सीने फेब्रुवारीमध्ये ‘डी’ कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला होता.
एनआयएने एका निवेदनात म्हटले आहे की, दाऊद इब्राहिम कासकरला संयुक्त राष्ट्राने जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले आहे, अनीस इब्राहिम शेख, छोटा शकील, जावेद चिखना आणि टायगर मेमन यांसारखे त्याचे जवळचे सहकारी डी-कंपनी नावाचे आंतरराष्ट्रीय दहशतवादी नेटवर्क चालवतात.
दाऊद इब्राहिम आणि त्याचे हस्तक आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादी कारवायांमधे सहभागी होत असून लष्कर-ए- तय्यबा, अल कायदा आणि जैश ए मोहम्मद या संघटनांसाठी काम करत आहेत. तसेच शस्त्रास्त्रांची तस्करी, नार्को-टेररिझम, अंडरवर्ल्ड गुन्हेगारी सिंडिकेट, मनी लाँड्रिंग, एफआयसीएनचे संचलन, दहशतवादी निधी उभारण्यासाठी मुख्य मालमत्तेचा अनधिकृत ताबा/संपादन आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांसह सक्रिय सहकार्याने काम करणे. असे निवेदनात म्हटले आहे.
या गुन्हेगारांविषयी माहिती देणाऱ्यांना हे बक्षीस देण्याचं एनआयएनं जाहीर केलं आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com