30 thousand 310 websites, apps, social media accounts banned
३० हजार ३१० वेबसाईट, अॅप्स, सोशल मीडिया खात्यांवर बंदी
इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या ३० हजार ३१० वेबसाईट, अॅप्स, सोशल मीडिया खात्यांवर बंदी घालण्याच्या सूचना
नवी दिल्ली : देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडता तसंच इतर सुरक्षेचा विचार करून इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं ३० हजार ३१० वेबसाईट, अॅप्स, सोशल मीडिया खात्यांवर बंदी घालण्याच्या सूचना दिल्या आहेत असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे.
२०१८ पासून या माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या समितीनं विविध नोडल अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या सोशल मीडिया खाती, चॅनेल, पेजेस, अॅप्सची ४१ हजारांहून अधिक खात्यांच्या युआरएलची तपासणी केली असल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली.
या कायद्यांतर्गत देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडता, भारताचे संरक्षण, राज्याची सुरक्षा, सार्वजनिक सुव्यवस्था आणि इतर देशांसोबतचे मैत्रीपूर्ण संबंध याच्या हितासाठी ब्लॉकिंगबाबत आवश्यक कारवाई केली जाते, असे मंत्री म्हणाले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com