303 crore development works in the district approved by the Guardian Minister
जिल्ह्यातील ३०३ कोटींच्या विकासकामांना पालकमंत्र्यांची मंजुरी
पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ३०३ कोटींच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली.
बैठकीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव डॉ.राजेश देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी संजय मरकळे उपस्थित होते.
शासनाने जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत कामांना यापूर्वी स्थगिती दिली होती. प्रत्येक कामांची पालकमंत्र्यांनी तपासणी करून मंजुरी देण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार पालकमंत्री पाटील यांनी वार्षिक आराखड्यात समाविष्ट प्रत्येक कामांची माहिती घेतली.
जिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने आवश्यक असलेल्या ३०३ कोटींच्या कामांना यावेळी मंजुरी देण्यात आली. सर्व विकासकामे नियोनबद्ध पद्धतीने वेळेत पूर्ण करण्यात यावेत आणि कामांचा दर्जा चांगला राहील याकडेही विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com