4 Indian boxers in various groups at the Thailand Open International Boxing Championships
थायलंड खुल्या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत विविध गटात भारताचे ४ खेळाडू
थायलंड : थायलंड खुल्या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या आशिष कुमार, मोनिका, गोविंद साहनी आणि वरिंदर सिंग यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पुरुषांच्या ८१ किलो गटात आशिषने इंडोनेशियाच्या मायखेल रॉबर्ड मुस्किटाला ५-० नं पराभूत केलं.
महिलांच्या ४८ किलो गटात मोनिकानं व्हिएतनामच्या खेळाडूला उपांत्य सामन्यात नमवलं.
पुरुषांच्या ४८ किलो गटात गोविंदनंही व्हिएतनामच्या खेळाडूला अटीतटीच्या सामन्यात पराभूत केलं. पुरुषांच्या ६० किलो गटाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात वरिंदर सिंगला पुढची चाल मिळाल्यानं तो अंतिम फेरीत पोचला.
इतर गटांमध्ये भारताचे अमित पंघाल आमि भाग्यवती कचरी उपांत्य फेरीत पोचले आहे तर रोहित मोर याला उपांत्य फेरीत पराभूत व्हावं लागलं.
Hadapsar News Bureau.