5-6 logistics parks will be set up in Maharashtra: Union Minister Nitin Gadkari
महाराष्ट्रात 5-6 लॉजिस्टिक्स पार्क उभारण्यात येणार : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देशासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार विविध उपाययोजना राबवत आहे: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
मुंबई : सजीव सृष्टी तसेच पर्यावरण यांना संरक्षण देण्याला केंद्र सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले असून प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सरकार अनेक पर्यायांचा विचार करत आहे आणि त्या अनुषंगाने विविध प्रकल्पांवर युद्ध पातळीवर काम करत आहे.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही देशासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. देशातील एकूण वायू प्रदूषणापैकी सुमारे 40% वायू प्रदूषण रस्त्यांवरील वाहतुकीमुळे होत आहे आणि आता देशात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असे मत गडकरी यांनी यावेळी व्यक्त केले. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार विविध उपाययोजना राबवत असल्याचे ते म्हणाले.
मुंबईमध्ये सुरू करण्यात आलेली डबल डेकर बस तसेच बंगळूरु मध्ये सुरू करण्यात येत असलेली बससेवा हे या उपाययोजनांचे उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले. २६० रोप वे आणि केबल कार प्रकल्प दिल्ली आणि आसपासच्या भागात सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे अशा उपायांनी वाहतूक कोंडीची समस्या आणि वायू प्रदूषण कमी करण्यात नक्कीच हातभार लागणार आहे. अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिली. मुंबईत आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते.
याशिवाय, इलेक्ट्रिक महामार्ग अर्थात ई हायवे बनवण्यासाठी देखील केंद्र सरकार प्रयत्नशील आहे असे गडकरी म्हणाले. इलेक्ट्रिक बस, इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक स्कूटर ह्या आता कार्यान्वित झाल्या आहेतच मात्र त्याबरोबरच आता आपण फ्लेक्स इंजिन असलेल्या वाहनांचा वापर सुरु करत आहोत अशी माहिती गडकरी यांनी दिली.
हायड्रोजन हे आता भविष्यात प्रचलित होणारे इंधन असल्याचा पुनरुच्चार गडकरी यांनी यावेळी केला. मुंबईत इंधन म्हणून मिथेनॉलचा वापर करून बस आणि ट्रक चालवण्यात कुठलीही अडचण नाही असे नमूद करत गडकरी म्हणाले की यामुळे खर्चात बचत होईल आणि प्रदूषण देखील कमी होईल. केंद्र सरकारच्या या प्रयत्नांमुळे येत्या पाच वर्षात प्रदूषणाची समस्या मोठ्या प्रमाणात सोडवण्यात आपल्याला यश येईल असा विश्वास केंद्रीय मंत्री गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.
सार्वजनिक वाहतूक यंत्रणा देशातली अत्यावश्यक बाब असून महाराष्ट्र राज्यात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयातर्फे ५ ते ६ ठिकाणी लॉजिस्टिक पार्क्स उभारण्यात येतील, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज मुंबईत दिली.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com