6 people died in an accident on the Sangola-Miraj road in Maharashtra
महाराष्ट्राच्या सांगोला-मिरज रोडवर झालेल्या अपघातात ६ वारकऱ्यांचा मृत्यू
मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये तातडीच्या मदतीची घोषणा
सांगोला : महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला मिरज मार्गावर आज संध्याकाळी सात वाजता पंढरपूर कडे दर्शनाला निघालेल्या पायी दिंडींत भरधाव कार घुसल्यानं झालेल्या अपघातात ६ वारकऱ्यांचा मृत्यु झाला.
मृतांमध्ये ४ महिलांचाही समावेश आहे. या अपघातात जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात सुरु आहे. हे सारे जण कोल्हापूर जिल्ह्यातले असून ते पंढरपूर यात्रेला जात होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख
कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांना सांगोला-मिरज मार्गावर वाहनाने चिरडल्यामुळे झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये तातडीच्या मदतीचीदेखील त्यांनी घोषणा केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी हे वृत्त कळताच तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला तसेच या घटनेतील जखमी वारकऱ्यांना ताबडतोब योग्य ते उपचार देण्यात यावे असे निर्देश दिले. हा अपघात कसा झाला याविषयी तातडीने चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com