संत ज्ञानेश्वर यांच्या ७२५ व्या समाधी संजीवन वर्षानिमित्त व अध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Sant Dnyaneshwar Maharaj संत ज्ञानेश्वर महाराज हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Organizing spiritual and cultural programs on the occasion of the 725th Samadhi Sanjivan Varsha of Sant Dnyaneshwar – Minister Amit Deshmukh

संत ज्ञानेश्वर यांच्या ७२५ व्या समाधी संजीवन वर्षानिमित्त व संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव आणि संत मुक्ताई यांच्या ७२५ व्या निर्वाण वर्षानिमित्त अध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन- मंत्री अमित देशमुख

आळंदी : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य शासनामार्फत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत संत ज्ञानेश्वर यांच्या ७२५ व्या संपन्न झालेल्या समाधी संजीवन वर्षाचे औचित्य साधून व संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव आणि संत मुक्ताई यांच्या ७२५ व्या निर्वाण वर्षानिमित्त आळंदी येथील श्री संत भगवानबाबा मंगल कार्यालय येथे शनिवार व रविवार दिनांक १८ व १९ जून रोजी अध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे.Sant Dnyaneshwar Maharaj संत ज्ञानेश्वर महाराज हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव आणि संत मुक्ताई यांच्या समाधी वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्यावर आधारीत ज्ञानियांचा राजा या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १८ व १९ जून २०२२ या कालावधीत आळंदी येथील श्री संत भगवानबाबा मंगल कार्यालय येथे करण्यात आलेले आहे.

या कार्यक्रमात सारेगमप महाविजेती कार्तिकी गायकवाड व गौरव महाराष्ट्राचा महाविजेता कौस्तुभ गायकवाड हे सुप्रसिध्द कलाकार आपली कला सादर करणार आहेत, याशिवात दररोज हरिपाठ, व्याख्यान, किर्तन, भजन, अभंगवाणी, भक्तीगीते, भारुड, दिंडी इ. कलांचा अविष्कार या कार्यक्रमात पाहता येणार आहे.

शनिवार दिनांक १८ जून रोजी दुपारी ४ वाजता हरिपाठाने कार्यक्रमाची सुरुवात होईल. यानंतर संत निवृत्ती, संत सोपान व संत मुक्ताई यांच्या जीवनावर आधारीत व्याख्यान सादर हाईल. ह.भ.प.श्री. अक्षय महाराज भोसले हे किर्तन सादर करणार आहेत. याच दिवशी रात्रौ ८ वाजता भारुड, अभंगगीत, भक्तीगीत इ. भक्तीसंगीताचा कार्यक्रम प्रसिद्ध कलाकार कार्तिकी गायकवाड आणि कौस्तुभ गायकवाड हा कार्यक्रम सादर करणार आहेत.

रविवार दिनांक १९ जून रोजी दुपारी ४ वाजता हरिपाठ कार्यक्रम होईल. श्री स्वामीराज भिसे महाराज यांचे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवनावर व्याख्यान सादर करणार आहेत. संत ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडावर आधारीत समर्थ पाटील हे भजन सादर करतील. तर ह.भ.प.श्री. प्रमोद महाराज जगताप हे कीर्तन करणार असून ज्ञानेश्वर माऊलींच्या काव्यावार आधारीत ओडिसी नृत्य श्रीमती शुभदा दादरकर आणि सहकारी सादर करणार आहेत तसेच भूपाळी ते भैरवी कलामंच ही संस्था गण, गौळण, नमन, भूपाळी, ओवी, वासुदेव, दिंडी, कीर्तन, भारुड, पसायदान इ. कार्यक्रम सादर करणार आहेत.

आळंदी येथे आयोजित ज्ञानियांचा राजा या कार्यक्रमात सहभागी कलाकारांचा कला अविष्कार किंबहूना प्रबोधनातून संतांच्या पुरोगामी विचारांचा जागर करणाऱ्या कलावंतांचे किर्तन, व्याख्यान, हरिपाठ, भजन अशा आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा रसिक प्रेक्षकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक श्री. बिभीषण चवरे यांनी केले आहे.

हडपसर न्युज ब्युरो

 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *