75 SWAG Events” initiative was implemented jointly by Pune Municipal Corporation and Swachh Pune Swachh Bharat.
पुणे महानगरपालिका व स्वच्छ पुणे स्वच्छ भारत यांचे संयुक्त विद्यमाने “75 SWAG Events” उपक्रम.
पुणे : स्वच्छ पुणे स्वच्छ भारत ही स्वयंसेवी संस्था पुणे महानगरपालिका, घनकचरा व्यवस्थापन विभागासमवेत अनेक स्वच्छतापर नाविन्यपूर्ण उपक्रम राबवीत असते.
भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षपूर्ती निमित्त पुणे महानगरपालिका व स्वच्छ पुणे स्वच्छ भारत संस्थेकडून शहरातील विविध स्वयंसेवी संस्थांना एकत्रित करून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत दिनांक १४ ऑगस्ट २०२२ रोजी शहरात एकाच वेळी ७५ पेक्षा अधिक ठिकाणी विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले.
यामध्ये विविध स्वयंसेवी संस्थांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले व त्याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. या उपक्रमामध्ये ५८ विविध संस्था, शाळा/महाविद्यालये यांनी सहभागी घेतला.
या “75 SWAG Events” अंतर्गत स्वच्छता, Waste Collection & Recycling, Awareness Campaign व Go Green- Plantation हे उपक्रम समाविष्ठ होते.
१५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत एकूण 70 हून अधिक ठिकाणी सार्वजनिक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी स्थानिक नागरिक, स्वयं सेवी संस्थांचे प्रतिनिधी, मोहल्ला कमिटी सदस्य असे एकूण 3530 नागरिक सहभागी झाले.
एकूण 70 हून अधिक ठिकाणी ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून एकूण २२१७५ किलो कचरा संकलन करण्यात आले. तसेच नदीपात्राच्या ठिकाणी स्वच्छता मोहीम 15 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे.
SWAG उपक्रमांतर्गत ई-कचरा, टाकाऊ कपडे व प्लास्टिक कचरा संकलनासाठी शहरातील विविध बस डेपो/स्टॅन्ड व रेल्वे स्टेशन या ठिकाणी एकूण 20 संकलन केंद्रे उभारण्यात आली. या संकलन केंद्रांद्वारे ४५ किलो ई कचरा २१४६ किलो प्लास्टिक कचरा ५०० +किलो कपडे व इतर कचरा १३७४५ किलो कचरा संकलित करण्यात आला.
त्याचबरोबर सारे जहा से अच्छां या संस्थेमार्फत थुंकणे विरोधी जनजागृती उप्रकम राबविण्यात आला. शहरातील विविध ठिकाणी फ्लॅश मॉब, स्ट्रीट प्ले, पोवाडा, सायकल/बाईक रॅली इ.मार्फत जनजागृती करण्यात आली.
SWAG उपक्रमांतर्गत शहरातील अनेक ठिकाणी वृक्षारोपण देखील करण्यात आले. यामध्ये GHG संस्थेमार्फत चतुश्रुंगी हिल याठिकाणी, Nelda संस्थेमार्फत हनुमान टेकडी याठिकाणी, 51 A यांचेमार्फत वेताळ टेकडी याठिकाणी, पुणे गो ग्रीन यांचेमार्फत क्वाड्रट हिल याठिकाणी, वीरविद्या यांचेमार्फत तळजाई टेकडी याठिकाणी, बिंग व्हॉलंटीयर यांचेमार्फत रामटेकडी व म्हाळुंगे याठिकाणी, वसुंधरा यांचेमार्फत बाणेर हिल याठिकाणी वृक्षारोपण केले गेले.
या संपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन मा.महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका व मा.अतिरिक्त महापालिका आयुक्त (ई) यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
या कार्यक्रमांतर्गत कल्याणी शाळा,माजरी, हडपसर गाडीतळ या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छता मोहीम, रामटेकडी या ठिकाणी वृक्षारोपण, व पुणे स्टेशन परिसरात पोवाडा व फ्लॅश मॉब या उपक्रमांच्या ठिकाणी श्रीमती आशा राऊत, उप आयुक्त, घनकचरा व्यवस्थापन, डॉ.केतकी घाटगे, सहाय्यक आरोग्य अधिकारी, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छ पुणे स्वच्छ भारत संस्थेचे विंग कमांडर श्री.पुनीत शर्मा व श्री.सत्या नटराजन, सारे जहाँ से अच्छा चे प्रीती ,इ.उपस्थित होते. कल्याणी शाळा व IIEBM, Wakad येथील MBA college चे विध्यार्थी यांनी अतिशय उत्कृष्ट पथनाट्य सादर केले..
शहर स्वच्छता राखण्याकरिता नागरिकांना आवाहन करण्यात आले व अशा पर्यावरण पूरक उपक्रमांचे आयोजन आगामी गणेशोत्सव व पुढील काळात करण्यात येईल असे सर्व सहभागी संस्थांनी सांगितले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com