“75th Independence Day” was celebrated on behalf of Pune Municipal Corporation on the occasion of Amrit Mahotsav of Indian Independence.
“भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्य पुणे महानगरपालिकेच्या वतीने “७५” वा स्वातंत्र्यदिन सम्पन्न.
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अर्थात ७५, वा, स्वातंत्र्यदिन पुणे महानगरपालिकेच्या प्रांगणात अतिशय उल्हासात सम्पन्न झाला.
पुणे महानगरपालिकेच्या प्रांगणातील श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांस मा.महापालिका आयुक्त तथा प्रशासक श्री,विक्रम कुमार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व त्यांच्या हस्ते या प्रसंगी ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी मा.अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, मा,अतिरिक्त आयुक्त श्री. रवींद्र बिनवडे, मा,अतिरिक्त आयुक्त श्री. विलास कानडे तसेच विविध विभागाचे मा,खातेप्रमुख,अधिकारी,कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त याप्रसंगी ‘घर घर तिरंगा’ भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मा. महापालिका आयुक्त श्री. विक्रम कुमार यांच्या हस्ते या सायकल रॅलीला फ्लॅग ऑफ करण्यात आला. अत्यंत उल्हासपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आलेल्या या सायकल रॅलीमध्ये मोठ्या संख्येने पुणेकर नागरिक सहभागी झाले होते.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com