9 people commit suicide by drinking poison at Mahisal in the Sangli district
सांगली जिल्ह्यात म्हैसाळ इथं ९ जणांची विष पिऊन आत्महत्या
सांगली: सांगली जिल्ह्यातल्या म्हैसाळ इथं एकच घरातल्या नऊ जणांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचं वृत्त आहे. येथील डॉ. माणिक वनमोरे यांच्यासह घरात सहा मृतदेह तर निवृत्त शिक्षक पोपट वनमोरे यांच्या घरात तीन मृतदेह मिळून आले आहेत. घटनास्थळी पोलिस पंचनामा सुरू असून अधिक माहिती घेण्याचं काम सुरू आहे.
आत्महत्या केलेल्या पोपट वनमोरे यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली असून, या चिठ्ठित काही लोकांची नावं आणि सांख्यिकी आकडेवारी असून गुप्तधनाच्या मागे लागून कर्जबाजारी झाल्यानं या कुटुंबानं सामूहिक आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे, मात्र आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरजेचे शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. तर वन मोरे कुटुंबीयांच्या घरातील जेवणाचे नमुने मुंबईच्या प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याविषयी अधिक माहिती पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली आहे.
हडपसर न्युज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com