‘हायड्रोजन एनर्जी सिस्टीम’ या विषयावर ३ दिवसीय कार्यशाळा संपन्न

Savitribai Phule Pune Universiy

A 3 days workshop on ‘Hydrogen Energy System’ concluded

विद्यापीठाच्या सेंटर फॉर एनर्जी स्टडीज येथे ‘हायड्रोजन एनर्जी सिस्टीम’ या विषयावर ३ दिवसीय कार्यशाळा संपन्न

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा सेंटर फॉर एनर्जी स्टडीज विभाग पुणे आणि दानाव ग्रीन टेक सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘हायड्रोजन एनर्जी सिस्टम्स’ या विषयावरील ३ दिवसीय कार्यशाळेचे आयोजन नुकतेच विद्यापीठात करण्यात आले होते.Savitribai Phule Pune University

या कार्यशाळेचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सेंटर फॉर एनर्जी स्टडीजचे समन्वयक डॉ.आदित्य अभ्यंकर, डॉ. संजय धांडे (पद्मश्री), डॉ. एस व्ही घैसास, डॉ. पंडित विद्यासागर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिकारी, विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

डॉ.काळे यांनी शाश्वतता आणि ऊर्जेची सुरक्षितता ही काळाची गरज असल्याचे सांगितले. तर डॉ.अभ्यंकर म्हणाले, सेंटर फॉर एनर्जी स्टडीजच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आणि सुरक्षित असणाऱ्या नव्या तंत्रज्ञानावर आणि स्वच्छ इंधनावर काम केले जाते. या सत्राचे संचालन विभागातील सौर ऊर्जा विषयक तज्ज्ञ डॉ. अनघा पाठक यांनी केले.

सहभागींमध्ये सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, अजिंक्य डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटी, एआयएसएसएमएस आयटीआय कॉलेज, एसपीपीयू आणि एनरटेक, कल्याणी फोर्ज, थरमॅक्स, आयनॉक्स एअर, एचटूई, एचएमईआरएल, एनसीएल आणि इतर संशोधन संस्थांमधील प्राध्यापक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते.

या कार्यशाळेची सांगता १९ नोव्हेंबर रोजी झाली. यावेळी विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

या कार्यशाळेच्या माध्यमातून अभियांत्रिकी आणि विज्ञानाच्या विद्यार्थ्यांसाठी हायड्रोजन ऊर्जा क्षेत्रातील करिअरच्या संधी आणि त्या विषयातील सखोल ज्ञान मिळण्यास मदत झाली. तसेच या विषयातील संशोधनाच्या संधीचीही माहिती झाली असे डॉ.पाठक यांनी सांगितले. यावेळी विभागातील डॉ.किरण देशपांडे हेही उपस्थित होते.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *