तंत्रज्ञानाची मोठी क्रांती येऊ घातली आहे – डॉ. विजय भटकर

A big revolution in technology is about to take place – Dr Vijay Bhatkar

तंत्रज्ञानाची मोठी क्रांती येऊ घातली आहे – डॉ. विजय भटकर

पुणे : आजच्या तंत्रज्ञानाचा आविष्कार मोठा आहे, मेटॅबससारखी मोठी क्रांती येऊ घातली आहे, त्यामुळे येणार्‍या काळाशी जुळवून घेण्याची क्षमता निर्माण करायला हवी, असे प्रतिपादनA big revolution of technology is about to take place - Dr. Vijay Bhatkar तंत्रज्ञानाची मोठी क्रांती येऊ घातली आहे - डॉ. विजय भटकर  हडपसर मराठी बातम्या  Hadapsar News परमसंगणकाचे निर्माते, ज्येष्ठ संगणकतज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी आज येथे बोलतांना केले. भक्तिसुधा या अध्यात्मिक अ‍ॅपच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. सुप्रसिद्ध निरुपणकार व उपनिषदांच्या अभ्यासक डॉ. कल्याणीताई नामजोशी, ज्येष्ठ अभिनेेेते राहुल सोलापूरकर आणि भक्तिसुधा अ‍ॅपचे निर्माते व संगीतकार आशिष केसकर व्यासपीठावर उपस्थित होते.

आपल्या देशातील अनेकविध पंथातील, संप्रदायातील ज्ञान भांडाराचा भारतीय समाजाला लाभ घेता यावा यासाठी संगीतकार आशिष केसकर यांनी ओरायन स्टुडियोजच्या माध्यमातून एक वर्षापूर्वी भक्तिसुधा या इंटरनेट रेडिओ स्टेशनची सुरुवात केली. या रेडिओ स्टेशनवरून प्रवचन, निरूपण, कीर्तन प्रसारित होत असते, त्याच्या भक्तिसुधा मोबाइल अ‍ॅपचे आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. भटकर बोलतांना पुढे म्हणाले की, भारताकडे आज संपूर्ण विश्‍व मोठ्या आशेने पाहतो आहे. आपल्याकडे तरुण शक्ती आहे. कल्पनाशक्ती भव्य असणारी माणसे आहेत, म्हणूनच मोठे प्रकल्प होऊ शकत आहेत. तंत्रज्ञानाची सांग़ड घालत आपला देश पुढे जाण्यासाठी सर्वांनीच संगणक साक्षर होण्याची गरज आहे.

यावेळी बोलतांना डॉ. नामजोशी म्हणाल्या की, आपली संस्कृती आणि परंपरा शाश्‍वत आहे आणि म्हणूनच ती सत्य आहे. अध्यात्म आणि प्रेम हाच भारताचा पाया आहे. हाच पाया भक्कम करण्याची आवश्यकता आहे. सत्याचा शोध सातत्याने घेत राहिलो तर आपण समृध्दीकडे निश्‍चित जाऊ शकतो. ज्याची जेथे आवश्यकता असते तेथे त्याची निर्मिती हमखास होते. त्यामुळेच आपल्या संस्कृतीची थोर परंपरा जपण्यासाठी तंत्रज्ञान महत्वाचे आहे. श्री. सोलापूरकर यांनी अक्षय तृतीयेच्या महत्वाच्या शुभदिनाचे वैशिष्ट्ये सांगून या अ‍ॅपची गरज प्रतिपादीत केली.

सौ. भाग्यश्री केसकर यांनी आभार मानले तर मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. आदिती केसकर यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. अद्वैत केसकर यांनी भक्तिसुधा अ‍ॅपची तंत्रज्ञान माहिती उपस्थितांना दिली.

हडपसर न्यूज ब्युरो

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *