‘सैन्य रणक्षेत्रम 2.0 – सायबर धोके’ या विषयावरील चर्चासत्र तसेच कार्यशाळेचे आयोजन

Organized seminar and workshop on 'Army Battlefield 2.0 - Cyber Threats' 'सैन्य रणक्षेत्रम 2.0 - सायबर धोके' या विषयावरील चर्चासत्र तसेच कार्यशाळेचे आयोजन हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Indian Army Organises Sainya Ranakshetram 2.0 – A Cyber Threat Seminar Cum Workshop

भारतीय सैन्याने ‘सैन्य रणक्षेत्रम 2.0 – सायबर धोके’ या विषयावरील चर्चासत्र तसेच कार्यशाळेचे केले आयोजन

नवी दिल्‍ली : लष्कर प्रशिक्षण कमांड मुख्यालयाच्या (एआरटीआरएसी) नेतृत्वाखाली ऑक्टोबर 2022 ते जानेवारी 2023 या कालावधीत दुसऱ्या “सैन्य रणक्षेत्रम 2.0” हॅकेथॉनचे भारतीय सैन्याने आयोजन केले होते. Organized seminar and workshop on 'Army Battlefield 2.0 - Cyber Threats' 'सैन्य रणक्षेत्रम 2.0 - सायबर धोके' या विषयावरील चर्चासत्र तसेच कार्यशाळेचे आयोजन हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

सायबर आव्हानांवर उपाय शोधणे आणि सायबर सुरक्षा क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपायांकरीता संशोधनाला प्रोत्साहन तसेच विकासकामांना चालना देणे हा याचा मुख्य उद्देश होता. यातील पारितोषिक विजेत्यांना 17 जानेवारी 2023 रोजी दूरदृश्य कार्यक्रमावेळी लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

विशिष्ट क्षेत्रातील स्वदेशी प्रतिभा हुडकण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि सायबर प्रतिबंध, सुरक्षित सॉफ्टवेअर कोडिंग, इलेक्ट्रो मॅग्नेटिक स्पेक्ट्रम ऑपरेशन्स (ईएमएसओ) आणि कृत्रिम बुद्धीमत्ता/मशीन लर्निंग (एआय/एमएल) या क्षेत्रामधील प्रशिक्षणाचा दर्जा वाढवणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. हॅकेथॉनमधे सर्व भारतीय नागरिकांसाठी प्रवेश खुला होता आणि वैयक्तिक / सांघिक अशा दोन्ही पद्धतीने सहभागाची परवानगी होती.

कार्यक्रमाच्या शेवटी सायबर धोके या विषयावरील चर्चासत्र तसेच कार्यशाळा चार उप-भागाअंतर्गत आयोजित करण्यात आली. यात खालील बाबींचा समावेश होता:-

सुरक्षित सॉफ्टवेअर कोडींग:

सॉफ्टवेअर प्रोग्राम सुरक्षित करण्याच्या आणि सॉफ्टवेअर कोडमध्ये सायबर सुरक्षा आवश्यकता पूर्ण करण्यास सक्षम प्रतिभा हुडकण्याच्या क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रालाही जोडणे हे त्याचे उद्दिष्ट होते. सायबर सुरक्षा क्षेत्रात अनेक प्रमाणपत्रे आणि पुरस्कारप्राप्त करणारे कोईम्बतूर येथील अरविंद हरिहरन एम यांनी या श्रेणीमध्ये पारितोषिक जिंकले.

ईएसएमओ:

वाय-फाय 6 करिता खास भारतीय सेनेसाठी तयार केली जाणारी प्रणाली – सुरक्षेची पातळी उंचावण्यासाठी खास भारतीय सैन्यासाठी सुरक्षित वाय-फाय प्रणालीच्या अंमलबजावणी करता उपाय शोधणे हा या उप-स्पर्धेचा/उद्देश होता. या श्रेणीमध्ये लष्कर मुख्यालयात कॉम्प्युटर केन्द्राचे कमांडंट कर्नल निशांत राठी विजेता ठरले. सध्या एल अँड टी मधे काम करत असलेले सूर्यसारधि बलारकन उपविजेता ठरले असून सध्या डार्क एनर्जी मधे पीएचडी करत असलेल्या तनीषा जोशी यांना तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला.

कृत्रिम बुद्धीमत्ता/मशीन लर्निंग:

एनएलपी प्रोसेसिंग आणि रेडिओ इंटरसेप्ट्सचे डीकोडिंग. या उप स्पर्धेने बहुभाषिक रेडिओ प्रसारणाचे भाषांतर आणि विवेचन संबोधित करण्यासाठी एक कृत्रिम बुद्धीमत्ता व्यवस्था तयार करण्यात मदत केली. महाराष्ट्रातील नांदेड येथील ज्ञान माता विद्या विहारचा इयत्ता दहावीत शिकणारा अवघ्या 15 वर्षाचा मिथिल साळुंखे या श्रेणीमध्ये पहिला आला. पंजाब तंत्र विद्यापीठातून बीटेक (सीएस) असलेले आणि सध्या आयआयटी मद्रासमधून बीएससी (डेटा सायन्स) करत असलेले प्रशांत कुमार सिंग द्वितीय आले आहेत, तर सध्या पूर्व नौदल कमांड मुख्यालयात तैनात असलेले नौदल अधिकारी सीडीआर सुशांत सारस्वत यांनी तिसरे स्थान पटकावले.

सायबर प्रतिबंध:

सध्याची सायबर सुरक्षा व्यवस्था सक्षम करण्याकरिता प्रतिभा हुडकण्यासाठी हे सात टप्प्यातील सायबर सुरक्षा आव्हान होते. हैदराबाद येथील एमव्हीएसआर अभियांत्रिकी महाविद्यालयातील बीई (सीएस) सक्षम जैस्वाल यांनी हे आव्हान जिंकले. ते सध्या फ्रीलांसर म्हणून काम करत आहेत. त्यांच्याकडे या क्षेत्रातील 15 पेक्षा अधिक पात्रता आहेत. द्वितीय पारितोषिक विजेते प्रिन्स कुमार पटेल सध्या पुण्यातील लष्करी तंत्रज्ञान संस्थेत (एआयटी), बीई (आयटी) करत आहेत तर तृतीय पुरस्कारप्राप्त हरदीप सिंग यांनी बिकानेर येथील महाराजा गंगा सिंग विद्यापिठातून बीसीए केले आहे.

संरक्षण दल आणि नागरी शैक्षणिक क्षेत्र अशा दोहोंमधे सायबर सुरक्षा क्षेत्रातील योग्य प्रतिभा हुडकण्यासाठी वैयक्तिक, शैक्षणिक आणि संस्थांच्या पातळीवरील आंतरिक प्रतिभांशी जोडले जाण्याची सुविधा या सेमिनार तसेच कार्यशाळेने प्रदान केली. हुडकलेल्या प्रतिभेचा उपयोग केंद्रित सहभागासाठी केला जाऊ शकतो. यामुळे सायबर सुरक्षा साधने आणि तंत्रांचा वेगाने विकास होईल.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *