खगोलभौतिकशास्त्रज्ञ प्रा.डॉ.एस.अनंथकृष्णन यांचे व्याख्यान

Savitribai Phule Pune Universiy

Conducting a lecture by astrophysicist Prof. Dr S. Ananthakrishnan

खगोलभौतिकशास्त्रज्ञ प्रा.डॉ.एस.अनंथकृष्णन यांच्या व्याख्यानाचे आयोजन

Savitribai Phule Pune Universityपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक अँड इन्स्ट्रुमेंटेशन सायन्स विभागात प्रतिष्ठित प्राध्यापक म्हणून मार्गदर्शन करणारे प्रा.डॉ.एस. अनंथकृष्णन यांना इंडियन ‘नॅशनल सायन्स अकॅडमी’ तर्फे २०२१ सालासाठी प्रा.एस.के.जोशी मेमोरियल मेडल प्रदान करण्यात आले आहे. ते राजा रामण्णा या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून अस्ट्रोफिजिक्स आणि स्पेस इलेक्ट्रॉनिक्स विषयातील संशोधन प्रकल्पावर प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत.

प्रा. अनंथकृष्णन यांना मिळालेल्या या पुरस्कारासाठी विद्यापीठातील ‘इलेक्ट्रॉनिक अँड इन्स्ट्रुमेंटेशन सायन्स’ विभागातर्फे ११ मार्च २०२३ रोजी दुपारी तीन वाजता त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन भौतिकशास्त्र विभागातील सी. व्ही. रमण सभागृहात करण्यात आले आहे. ‘ लो फ्रिकवेन्सी रेडिओ अस्ट्रोनॉमी फ्रॉम स्पेस ‘ या विषयावर ते मार्गदर्शन करणार आहेत.

प्रा. अनंथकृष्णन हे ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ‘ येथील अनुभवी खगोलभौतिकशास्त्रज्ञ आहेत. तसेच ते ‘जायंट मेट्रेवेव रेडिओ टेलिस्कोप’ (जीएमआरटी) चे माजी संचालक आहेत. मोठ्या रेडिओ दुर्बिणीच्या उभारणीत त्यांचा महत्वाचा वाटा आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *