कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या अंमलबजावणीसाठी उत्पादकांची सूची तयार करण्यात येणार

A list of producers will be prepared for the implementation of agricultural mechanization scheme

कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या अंमलबजावणीसाठी उत्पादकांची सूची तयार करण्यात येणार

पुणे : केंद्र पुरस्कृत कृषी योजनांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कृषी आयुक्तालय स्तरावर कृषी यंत्रे व अवजारे उत्पादक व त्यांच्या अधिकृत विक्रेत्यांची सूची करण्यासाठी २० ऑगस्ट २०२२ पर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

सद्यस्थितीत राज्यात कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण, राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कृषी यांत्रिकीकरण प्रकल्प, राष्ट्रीय फलोद्यान अभियान, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, पोकरा आदी योजनांच्या माध्यमातून कृषी यांत्रिकीकरण या घटकासाठी शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या यंत्र व अवजारांसाठी महा-डीबीटी पोर्टलद्वारे अनुदान देण्यात येत आहे.

अनुदानावर पुरवठा करण्यासाठी पात्र सूचीमध्ये समाविष्ट उत्पादकांच्यामार्फत पुरवठा होणाऱ्या औजारांनाच अनुदान अनुज्ञेय राहील. सूचीसाठी करावयाच्या अर्जाचा नमुना, अटी व शर्ती, करारनामा, यंत्रे व औजारांची यादी आदी तपशील कृषी विभागाच्या http://www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

प्रस्ताव प्रत्यक्षरित्या कृषी उपसंचालक (किटकनाशके व औजारे, गुनि-५), निविष्ठा व गुणनियंत्रण विभाग, कृषी आयुक्तालय, मध्यवर्ती इमारत, पुणे येथे सादर करावे, असे आवाहन कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी केले आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *