युरिक ॲसिडच्या चाचणीसाठी नवे जैव इलेक्ट्रॉनिक उपकरण

A new bioelectronic device for testing uric acid युरिक ॲसिडच्या चाचणीसाठी नवे जैव इलेक्ट्रॉनिक उपकरण हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

A new bioelectronic device for testing uric acid

युरिक ॲसिडच्या चाचणीसाठी नवे जैव इलेक्ट्रॉनिक उपकरण

युरिक ॲसिडच्या चाचणीसाठी नव्याने बनवलेल्या जैव इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा वापर परिधान करता येणाऱ्या सेन्सर आणि पॉईंट ऑफ केअर निदानाकरताही होऊ शकतोA new bioelectronic device for testing uric acid
युरिक ॲसिडच्या चाचणीसाठी  नवे जैव इलेक्ट्रॉनिक उपकरण
हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

नवी दिल्ली : युरिक ॲसिडच्या चाचणीसाठी नव्याने तयार केलेल्या जैव इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा वापर परिधान करता येणाऱ्या सेन्सर आणि पॉईंट ऑफ केअर निदान यासह विविध अनुप्रयोगांसाठी करता येऊ शकतो.

यूरिक ऍसिड हे सर्वात महत्वाचे अँटिऑक्सिडंट आहे. ते रक्तदाब स्थिर राखते आणि सजीवांमध्ये ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करते. रक्तातील यूरिक ऍसिड साधारणपणे 0.14 ते 0.4 mmol dm-3 आणि लघवीसाठी 1.5 ते 4.5 mmol dm-3 या दरम्यान असते. मात्र, उत्पादन आणि उत्सर्जन यांच्यातील समतोल बिघडल्याने यूरिक ऍसिडच्या पातळीत चढ-उतार होतो त्यामुळे हायपरयुरिसेमियासारखे अनेक रोग होतात. परिणामी संधीवात, मधुमेह, हृदय , रक्तवाहिन्यासंबंधी आजार, लेश-न्याहान सिंड्रोम, उच्च रक्तदाब, आणि मूत्रपिंडाचे विकार यांचा धोका वाढतो.

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या (DST) स्वायत्त संस्थेच्या, इनस्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड स्टडी इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी (IASST) मधील संशोधकांनी हे उपकरण तयार केले आहे.

फॉस्फोरीनच्या कमी केलेल्या क्वांटम डॉट्सपासून ते बनवले असून- अनोख्या भौतिक-रासायनिक आणि पृष्ठभाग गुणधर्मांसह शून्य-आयामी कार्यात्मक नॅनोस्ट्रक्चर्सचा हा एक नवीन वर्ग आहे.

क्वांटम डॉट्स, जैव वैद्यकीय अनुप्रयोगांमधे विशिष्ट विद्युत कार्यप्रदर्शन दर्शवतात.त्यामुळे उच्च-कार्यक्षमता असलेले इलेक्ट्रिकल जैव सेन्सर तयार करण्यासाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो.

या उपकरणासाठी वर्तमान-व्होल्टेज आणि प्रतिरोध (विरोधी इलेक्ट्रॉन प्रवाह) प्रतिसादांचा अभ्यास वाढलेल्या यूरिक ऍसिडसाठी केला गेला आहे. यूरिक ऍसिडमधे वाढ झाल्यामुळे, वर्तमान घनता वाढते आणि कमाल प्रवाह सुमारे 1.35 × 10-6 A दर्शवला जातो.

हे उपकरण युरिक ऍसिडच्या संपर्कात आल्यावर अंतर दर्शविते. वारंवार प्रयोगांसाठी उपकरणाचा वापर करण्यास ते सक्षम करते. परिणामकारकता आणि खर्चाच्या बाबतीत ते सध्या उपलब्ध असलेल्या सर्वांपेक्षा उत्तम आहे कारण त्याला कोणत्याही जैव उत्प्रेरकाची आवश्यकता नाही.

मानवी रक्त आणि मूत्र यांसारख्या वास्तविक नमुन्यांसह या उपकरणाच्या प्रतिसादाची तपासणी करण्यात आली. वापरायला सोपे असावे, कुठेही नेता यावे, किफायतशीर आणि सुमारे 0.809 μM मर्यादेसह यूरिक ऍसिड शोधता यावे याप्रकारे हे उपकरण विकसित केले आहे.

प्रा. नीलोत्पल सेन सरमा आणि त्यांची पीएच. डी.ची विद्यार्थिनी नसरीन सुलताना यांच्या नेतृत्वाखालील हे काम नुकतेच एसीएस अप्लाइड इलेक्ट्रॉनिक मटेरियल्स या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *