A person who migrated from Mumbai to Gujarat contracted a new form of corona XE
मुंबईहून गुजरातला गेलेल्या एका व्यक्तीला कोरोनाच्या एक्स ई या नव्या स्वरुपाची लागण
मुंबई : मुंबईहून गुजरातला गेलेल्या एका व्यक्तीला कोरोनाच्या एक्स ई या नव्या स्वरुपाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं निदान झाल्यानंतर, त्याचे नमुने जिनोमिक सिक्वेसिंगसाठी पाठवले होते.
त्यात त्याला एक्स ई या नव्या स्वरुपाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र कोरोनाचं हे स्वरुप फारसं घातक नाही असं ते म्हणाले.
या नव्या स्वरुपामुळे केंद्र सरकारनं ५ राज्यांना खबरदारी घेण्याविषयीचं पत्र पाठवलं आहे, पण महाराष्ट्रातली परिस्थिती फारशी वाईट नाही असं त्यांनी स्पष्ट केलं.
Hadapsar News Bureau.