All states meet in view of a rising rate of influenza infections
इन्फ्लुएंझा संसर्गाच्या वाढत्या प्रमाणाच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांची बैठक
नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं कोरोना आणि इन्फ्लुएंझा संसर्गाच्या वाढत्या प्रमाणाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी आज सर्व राज्यांची बैठक बोलावली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या आरोग्यसचिव आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलतील. सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा राज्यनिहाय आढावा बैठकीत घेण्यात येईल.
एन्फ्लुएन्झा संबंधित विषाणूंच्या प्रादुर्भावावर बारकाईने नजर ठेवण्याचा सल्ला देणारं पत्र नुकतंच केंद्रीय आरोग्य सचिव आणि भारतीय वैद्यक संशोधन मंडळाचे महासंचालक डॉ राजीव बहल यांनी सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना लिहीलं होतं.
गेल्या आठवड्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोविड-19 आणि इन्फ्लूएंझा परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी एका उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षपदही घेतले. बैठकीदरम्यान, त्यांनी आरोग्य पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक्सची तयारी, लसीकरण मोहिमेची स्थिती, नवीन कोविड-19 रूपे आणि इन्फ्लूएंझा प्रकारांचा उदय आणि देशासाठी सार्वजनिक आरोग्यावरील परिणामांचे मूल्यांकन केले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com