A Special program on the birth anniversary of Bhimsen Joshi
भीमसेन जोशी यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम
ललित कला केंद्र (गुरुकुल) व भीमसेन जोशी अध्यासनाद्वारे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र (गुरुकुल) व भीमसेन जोशी अध्यासनाद्वारे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ गायक पंडित मिलिंद चित्ताल (पं. फिरोज दस्तूर यांचे शिष्य) हे शास्त्रोक्त गायन प्रस्तुत करतील. त्यांना भरत कामत (तबला), डॉ. चैतन्य कुंटे (हार्मोनिअम) हे साथसंगत करतील.
कार्यक्रमात आरंभी विख्यात गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या षष्ट्यब्दीनिमित्त त्यांचा सन्मान केला जाईल. तसेच, विभागात गुरु म्हणून कार्यरत असलेल्या पं. पद्माकर थत्ते यांच्या स्मृतीनिमित्त थत्ते कुटुंबियांकडून ‘पं. पद्माकर थत्ते स्मृति शिष्यवृत्ती पुरस्कार’ दिला जातो. यंदाच्या वर्षी होनराज मावळे या विद्यार्थी कलाकाराची निवड शिष्यवृत्ती-पुरस्कारासाठी झाली आहे. याच कार्यक्रमात आरंभी पुरस्कार प्रदान समारंभ होईल.
सोमवार, दि. ६ फेब्रुवारी २०२३ रोजी सायं. ५:३० वा. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमधील संत ज्ञानेश्वर सभागृह येथे हा कार्यक्रम होणार आहे. सर्व श्रोत्यांना विनामूल्य प्रवेश आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com