A tourism and travel exhibition in Pune
पर्यटन व प्रवास प्रदर्शनाचे आयोजन
पुणे : महाराष्ट्र पर्यटन संचालनालय, विभागीय पर्यटन कार्यालय, आणि भारतीय पर्यटन विकास सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने १६,१७ व १८ सप्टेंबर या कालावधीत सेंट्रल पार्क हॉटेल, आपटे रोड, येथे ‘पर्यटन व प्रवास प्रदर्शनाचे’ आयोजन करण्यात येणार आहे.
सकारात्मक व्यावसायिक स्पर्धा निर्माण करून पर्यटकांना सहलीचा दर्जा आणि किंमत यांच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात फायदा मिळवून देणे या प्रदर्शनाचे मूळ उद्दिष्ट आहे. प्रदर्शनात राज्यभरातील सुमारे ६०- ७० पर्यटनाशी निगडीत व्यावसायिक सहभागी होणार आहे. तीन दिवसीय प्रदर्शनात महाराष्ट्र राज्यासह देश विदेशातील पर्यटक भेट देतात.
प्रदर्शनास भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी सोडत पद्धतीने सहल आणि भेटवस्तू आदी सुविधा असून पर्यटकांनी प्रदर्शनास भेट देऊन जास्तीत जास्त सवलतींचा व भेटवस्तुंचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय पर्यटन कार्यालयाच्या सहायक संचालक सुप्रिया करमरकर यांनी केले आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com