A trainer aircraft of Carver Aviation crashed at Kadbanwadi.
कार्व्हर एव्हिएशनचे, शिकाऊ विमान कडबनवाडी येथे कोसळले.
शिकाऊ महिला उमेदवार किरकोळ जखमी.
बारामती: एक शिकावू विमान(A Trainer Aircraft) कोसळल्याची (Crashed)घटना कडबनवाडी येथे घडली आहे. हे शिकाऊ विमान एका शेतात कोसळले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातात पायलट मुलगी किरकोळ जखमी झाली आहे. या तरुणीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आज दिनांक 25.07.2022 रोजी 11:20 ते 11:25 वाजेदरम्यान कार्व्हर एव्हिएशन बारामती यांचे शिकाऊ विमान (A Trainer Aircraft) कडबनवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे गावचे हद्दीत कोसळले.
यामध्ये एक शिकाऊ महिला उमेदवार भाविका राठोड वय २२ वर्ष रा. पुणे किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे असून विमानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
कार्व्हर एव्हिएशन बारामती यांचे शिकाऊ विमान (A Trainer Aircraft) हे इंधन संपल्यामुळे कडबनवाडी गावचे हद्दीत कोसळले.
कु. भविका राठोड या किरकोळ जखमी झाले असून त्यांना औषधउपचारासाठी नवजीवन हॉस्पिटल, शेळगाव या ठिकाणी पाठविण्यात आले आहे.
इतर कोणत्याही प्रकारची हानी नाही, घटना ठिकाणी कार्व्हर एव्हिएशन बारामती यांचे स्टाफ हजर असून योग्य बंदोबस्त घटनास्थळी ठेवला असल्याची प्राथमिक माहिती प्रशासनातर्फे प्राप्त झाली आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com