भारतीय विमानतळ प्राधिकरण ने किशनगढ विमानतळावर गगन आधारित एलपीव्ही प्रणित प्रक्रियेचा प्रयोग यशस्वी

AAI successfully conducts flight trials using GAGAN based LPV approach Procedure at Kishangarh Airport

भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) ने किशनगढ विमानतळावर गगन आधारित एलपीव्ही प्रणित प्रक्रियेचा प्रयोग यशस्वी केला

अशी कामगिरी करणारा आशिया-प्रशांत महासागर क्षेत्रातला भारत ठरला पहिलाच देश

नवी दिल्‍ली : भारतीय विमानतळ प्राधिकरणाने आज राजस्थानच्या किशनगढ इथे गगन म्हणजेच जीपीएस प्रणित जीओ युक्त दिशादर्शक प्रणालीचा आधार घेत, एलपीव्ही प्रणित दृष्टिकोन प्रक्रियांचा वापर करण्याचागगन आधारित एलपीव्ही प्रणित प्रक्रियेचा प्रयोग यशस्वी हडपसर न्यूज ब्युरो Hadapsar latest news, Hadapsar news प्रयोग यशस्वी केला आहे. ही चाचणी यशस्वी होणे, भारतासाठी महत्वाची कामगिरी असून, भारताच्या नागरी हवाई क्षेत्र इतिहासातील, विमान दिशादर्शक सेवा क्षेत्रातील मैलाचा दगड ठरली आहे. ही चाचणी यशस्वी करणारा, आशिया-प्रशांत क्षेत्रातील भारत हा पहिलाच देश ठरला आहे.

एलपीव्ही ( लोकलायझर परफॉर्मन्स विथ व्हरटीकल  गाईडन्स) मुळे विमानांना वाहतुकीसाठी  कॅट- IILS च्या तुल्यबळ अशी मार्गदर्शक प्रणाली उपलब्ध होते. त्यामुळे, त्यांना जमिनीवर असलेल्या दिशादर्शक पायाभूत सुविधा आवश्यक राहत नाहीत. या सेवा, जीपीएस आणि इस्रोने अवकाशात पाठवलेल्या गगन भू-स्थिर उपग्रहांवर (जी-सॅट-8, जी-सॅट-10 आणि जी-सॅट-15) वर अवलंबून आहे.

गगन ही भारतीय उपग्रह आधारित एकत्रित व्यवस्था (SBAS)  असून, एएआय आणि इस्रो ने संयुक्तपणे ती विकसित केली आहे. 

भारतासाठी आणि विषुवृत्तीय प्रदेशांसाठी विकसित करण्यात आलेली अशा प्रकारची ही पहिलीच व्यवस्था आहे. 2015 साली, डीजीसीए ने गगन प्रणालीला एपीव्ही- 1 साठी आणि विमानमार्गावरील -आरएनपी- 0.1 सेवांसाठी प्रमाणित केले होते. आज जगभरात, अशाप्रकारच्या केवळ चार अवकाश आधारित एकत्रित प्रणाली उपलब्ध आहेत. ज्यात भारताची गगन  (GAGAN), अमेरिकेची – WAAS, युरोपची (EGNOS) आणि जपानची (MSAS) प्रणाली आहे. गगन ही भारत आणि आजूबाजूच्या देशांसाठी बनवण्यात आलेली पहिलीच प्रणाली आहे.

इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाने आपल्या एटीआर विमानाचा वापर करत, आयएपी म्हणून गगनची सुविधा वापरत, एलपीव्ही सह 250 फुटांवर उड्डाण केले. गगन एलपीव्ही विमानांची चाचणी करण्याचा भाग म्हणून किशनगढ विमानतळावर ही उड्डाण करण्यात आले. यावेळी डीजीसीए चा चमूही विमानात उपस्थित होता. डीजीसीए कडून अंतिम मंजूरी मिळाल्यानंतर, ही प्रणाली व्यावसायिक उड्डाणाकरिता वापरली जाऊ शकेल.

एलपीव्ही ही एक उपग्रह आधारित प्रक्रिया असून, किशनगढ विमानतळावरुन उड्डाणासाठी तिचा वापर करण्यात आला.

भारताच्या हवाई दिशादर्शक व्यवस्थेत, अशा अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त सेवा उपलब्ध करुन देणे, त्यात सातत्य राखणे आणि त्या सेवा अद्ययावत करण्यासाठी एएआय सतत प्रयत्नशील असते. या यशामुळे, उपग्रह आधारित, विमान उतरवण्याची प्रक्रिया उपलब्ध असणारा भारत, हा आशियातील पहिलाच देश ठरला आहे.

हडपसर न्यूज ब्युरो

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *