Over 10 lakh patients benefited from Abha based scan and share service
आभा आधारित स्कॅन आणि शेअर सेवेचा 10 लाखांहून अधिक रुग्णांना लाभ
आयुष्मान भारत आरोग्य खाते (आभा) आधारित स्कॅन आणि शेअर सेवेचा 10 लाखांहून अधिक रुग्णांना लाभ
रुग्णालयाच्या रांगेत उभे राहण्यासाठी लागणाऱ्या वेळेची बचत होण्यास झाली मदत
या सेवेसाठी मोबाइल ॲप वापरून क्यू आरकोड स्कॅन करण्यासाठी स्मार्टफोनचा वापर करून नोंदणी
नवी दिल्ली : राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (NHA) आयुषमान भारत डिजिटल मिशन या (ABDM) योजनेअंतर्गत आरोग्य सेवांच्या वितरणात कार्यक्षमता आणण्यासाठी डिजिटल पध्दतीचा वापर करत आहे.
यापैकी एक ‘स्कॅन आणि शेअर’ ही सेवा आहे, जी सहभागी रुग्णालयांतील बाह्य रुग्ण विभागात (ओपीडी) रुग्णांची त्वरित नोंदणी करून घेते. या सेवेचा वापर सुरू झाल्यापासून सहा महिन्यांत यात 10 लाख रुग्णांची नोंदणी झाली आहे. गेल्या महिन्यात (23 फेब्रुवारी 2023) या सेवेद्वारे 5 लाख रुग्णांची नोंदणी केली गेली, प्रमाण लक्षणीय आहे. ही संख्या वाढल्याने स्कॅन आणि शेअर सेवेचा प्रभाव आणि स्वीकृती स्पष्ट होते.
स्कॅन आणि शेअर सेवेबद्दल बोलताना, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे प्रमुख कार्यकारी अधिकारी(एनएचएच, सीईओ) म्हणाले – “ आभाचे (एबीडीएम)उद्दिष्ट डिजिटल पध्दतीने सुरळीत आरोग्य सेवा वितरण परीसंस्था तयार करणे हे आहे.
स्कॅन आणि शेअर वैशिष्ट्यासह, रुग्णालये त्यांच्या रुग्णांना त्यांच्या आभा नोंदणीच्या आधारे थेट सामायिक करून डिजिटल नोंदणी सेवा देत आहेत. यामुळे रुग्णांना रांगेत उभे न राहता अथवा अनेक तपशील न टाकता त्वरित नोंदणी टोकन मिळण्यास मदत होत आहे.
सध्या, दररोज सरासरी सुमारे 25,000 रुग्ण ओपीडी टोकन घेत आहेत. लवकरच प्रतिदिन 1 लाख टोकन्सचा आकडा पार करण्याचा आमचा मानस आहे.यानंतर, आम्ही रुग्ण आणि आरोग्य सेवादाते यांच्यातील परस्परसंवादाची वैशिष्ट्ये वाढवण्याची योजना आखत आहोत.
स्कॅन आणि शेअर सेवा क्यूआर कोड आधारित थेट माहिती सामायिक करत कार्य करते. सहभागी रुग्णालये त्यांच्या रुग्ण नोंदणी काउंटरवर त्यांचे विशिष्ट क्यू आरकोड प्रदर्शित करतात. रुग्ण, या सेवेसाठी मोबाइल ॲप वापरून क्यू आरकोड स्कॅन करण्यासाठी त्यांच्या स्मार्टफोनचा वापर करून आपली नोंदणी करतात. (सध्या ABHA ॲप, आरोग्य सेतू, ड्रायफकेस, पेटीएम, बजाज हेल्थ आणि ई केअर यांच्याशी संलग्न केले आहे).
त्यानंतर रुग्ण त्यांचे आभा खाते (ABHA आयुष्मान भारत आरोग्य खाते) तयार करतो किंवा त्यांच्या विद्यमान आभा खात्यात लॉग इन करतो. डिजिटल आरोग्य प्रोत्साहन योजनेविषयी सविस्तर माहिती https://abdm.gov.in/DHIS या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com