विद्यापीठाचे तज्ज्ञ मंडळींच्या समितीकडून दोन दिवसीय शैक्षणिक परीक्षण

Savitribai Phule Pune Universiy

A two-day academic examination of the university by a committee of experts

विद्यापीठाचे तज्ज्ञ मंडळींच्या समितीकडून दोन दिवसीय शैक्षणिक परीक्षण

तज्ज्ञांची समिती घेणार आढावा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे शैक्षणिक लेखापरीक्षण दि.१५ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे. तज्ज्ञ मंडळींच्या समितीकडून होणाऱ्या या परिक्षणासाठी विद्यापीठातील शैक्षणिक व प्रशासकीय विभाग सज्ज झाले आहेत.

विद्यापीठ पातळीवर होणारे हे अंतर्गत मुल्यांकन शैक्षणिक दर्जा, संशोधन उंचावण्यासाठी महत्वाचे आहे. या अंतर्गत मुल्यांकनामुळे कमतरतांवर काम करत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या परीक्षणात अधिक चांगली कामगिरी करता येते. या परिक्षणातून विद्यापीठाची गुणवत्ता तपासणी केली जाते.
– डॉ.कारभारी काळे, कुलगुरु
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Savitribai Phule Pune University

सार्वजनिक विद्यापीठ कायद्यातील तरतुदींनुसार प्रत्येक सार्वजनिक विद्यापीठाला तीन वर्षांतून एकदा शैक्षणिक लेखापरीक्षण करून घेणे आवश्यक असते. हे लेखापरीक्षण विद्यापीठाबाहेरील तज्ज्ञांकडून करण्यात येते. यामध्ये बाहेरील विद्यापीठांचे माजी कुलगुरू, शास्त्रज्ञ, ज्येष्ठ आजी माजी प्राध्यापकांचा समावेश असतो.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत जे ५७ शैक्षणिक तसेच प्रशासकीय विभाग कार्यरत आहेत त्या विभागांची पाहणी दिनांक १५ व १६ नोव्हेंबर दरम्यान या तज्ज्ञ मंडळींकडून केली जाणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे व कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे शैक्षणिक परिक्षणाचे काम केले जाणार आहे.

या अंतर्गत लेखापरीक्षणातून विभागांची गुणवत्तेच्या निकषांनुसारची स्थिती तज्ज्ञांच्या अहवालातून स्पष्ट होईल. २०२४ साली विद्यापीठ नॅक प्रक्रियेत सहभाग घेणार असल्याने त्याच्या तयारीचा आराखडा व नियोजन या अहवालावरून करता येईल. या परिक्षणाचा विद्यापीठ मानांकन उंचावण्यासाठी संधी म्हणून उपयोग करेल.
डॉ.संजीव सोनवणे, प्र- कुलगुरु
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

याबाबत अधिक माहिती देताना अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षाचे संचालक डॉ.संजय ढोले म्हणाले, विद्यापीठाने तीन वर्षात केलेल्या कामाचा आमच्या पातळीवर आम्ही आढावा घेतला असून शैक्षणिक रंगीत तालीम देखील घेण्यात आली आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *