Accident on Solapur – Gangapur ST bus near Akkalkot this morning
सोलापूर – गाणगापूर एसटी बसला अक्कलकोट जवळ आज सकाळी अपघात
अपघाताची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली दखल.
गंभीर जखमींना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५० हजार रुपये
सोलापूर : सोलापूर-गाणगापूर एसटी बसला (Solapur-Gangapur ST Bus)अक्कलकोट-मैंदर्गी रस्त्यावर आज सकाळी अपघात. या अपघातात ३५ हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे.
ही बस अक्कलकोट (Akkalkot)हून कल्लाप्पावाडीकडे जात होती आणि त्याच दरम्यान एसटीला अपघात झाला. एसटी बस रस्त्यावरुन थेट शेजारील शेतात जाऊन पलटली आहे.
सकाळी साडे दहाच्या सुमारास अक्कलकोट – मैंदर्गी रस्त्यावरील (Akkalkot – Maindargi Road) शेतालगत बस पलटी होऊन ही मोठी दुर्घटना घडली.
या बसमध्ये जवळपास ७० प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती आहे. त्यापैकी ३५ हून अधिक प्रवासी जखमी झाले.
त्यापैकी ३० रुग्णांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात हलवले, तर इतर रुग्णांवर अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात, तर दोघांवर अक्कलकोटच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चार ते पाच प्रवाशांची प्रकृती ही गंभीर आहे.
अपघाताची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली दखल.
सोलापूर – गाणगापूर एसटी बसला अक्कलकोट(Solapur-Gangapur ST Bus) जवळ आज सकाळी झालेल्या अपघाताची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे.
अपघातात जखमी प्रवाशांना तातडीने अक्कलकोट किंवा जवळपासच्या रुग्णालयांत हलवून शासकीय खर्चाने योग्य त्या उपचारांची व्यवस्था करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
त्याचप्रमाणे अपघातात ज्यांना गंभीर दुखापत झाली आहे अशा ठराविक किंवा मोठा अस्थिभंग झालेल्या प्रवाशांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५० हजार रुपये अधिकची आर्थिक मदत करण्यात यावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
अपघात झाल्याचे कळताच मुख्यमंत्र्यांनी सोलापूर जिल्हाधिकारी तसेच एसटी महामंडळ व पोलिसांकडून याची माहिती घेतली व जखमी तसेच इतरही प्रवाशांची व्यवस्था करावी अशा सूचना दिल्या
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com