वराहमिहीराच्या प्राचीन ग्रंथाद्वारे पर्जन्यमानाचा अचूक अंदाज बांधणे शक्य

Dr. Raghavendra Gaikaiwari डॉ. राघवेंद्र गायकैवारी हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Accurate prediction of rainfall is possible through the ancient treatise of Varahamihira – Dr Raghavendra Gaikaiwari

वराहमिहीराच्या प्राचीन ग्रंथाद्वारे पर्जन्यमानाचा अचूक अंदाज बांधणे शक्य – डॉ. राघवेंद्र गायकैवारी

पुणे : भारतातील पर्जन्यमानाचे अंदाज हवामान खात्याकडून अधिकृतपणे येत असतात, मात्र आपल्या वराहमिहीर या विद्वानाने आपल्या बृहतसंहिता या प्राचीन ग्रंथात याबाबत उपयुक्त माहिती दिलेली असून त्यावर गेली चार वर्षे संशोधन, निरीक्षण आणि अभ्यास केल्यानंतर पावसाचे प्रमाण वर्तवणे आणि अचूक अंदाज बांधणे खरे ठरत असल्याचे ज्येष्ठ विज्ञान संशोधक डॉ. राघवेंद्र गायकैवारी यांनी आज येथे सांगितले.Dr. Raghavendra Gaikaiwari डॉ. राघवेंद्र गायकैवारी हडपसर मराठी बातम्या  Hadapsar Latest News Hadapsar News

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेमध्ये डॉ. गायकैवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या या ग्रंथावर संशोधन सुरु असून त्यासाठी केंद्र सरकारने देखील यासाठी पुढाकार घ्यावा असे प्रयत्न सुरु आहेत. या विषयावर लवकरच एक चर्चासत्र भांडारकर संस्थेत आयोजित केले जाणार आहे.

सुमारे ६ व्या शतकातील बृहतसंहिता या प्राचीन ग्रंथामध्ये भूगोल, खगोलशास्त्र, पाणी शोधण्याच्या पध्दती, पर्जन्यमानशास्त्र, वनस्पतीशास्त्र, ज्योतिष, भूकंप अशा विविध विषयांचा अंतर्भाव आहे. त्यातील पावसाचा अंदाज वर्तवण्याबाबत व पावसाच्या प्रमाणाबाबत अधिक अभ्यास केल्यानंतर काही अंदाज अचूकपण़े मांडता ये़णे शक्य झाले आहे.

मेदनिय ज्योतिष शास्त्र आणि अनेक प्राचीन ग्रंथांमधून असणाऱ्या ठोकताळ्यांचा संख्याशास्त्रीय पद्धतीने एकत्रीत विचार करून एक प्रमाणीत पद्धती विकसित करणे शक्य आहे.

याबाबत सविस्तरपणे माहिती देतांना डॉ. गायकैवारी म्हणाले की, प्रामुख्याने फेब्रुवारी महिन्यात येणारी होळी आणि एप्रिल महिन्यात येणारी अक्षयतृतीया हे दोन दिवस अशा पध्दतीचे पर्जन्यमानाचा अंदाज घेण्यासाठी महत्वाचे ठरतात.

होळी आणि अक्षयतृतीयेच्या दिवशी दिवसा व रात्रीच्यावेळी वाऱ्याचा असणारा वेग व त्याची दिशा आणि अवकाशातील ग्रहताऱ्यांची स्थिती व त्यांची क्रांतिवृत्ते यावरून कोणत्या भागात किती पाऊस पडेल याचे सूक्ष्म अनुमान करणे शक्य आहे.

प्रामुख्याने गेल्या काही वर्षांमध्ये यावर अधिक अभ्यास करून व त्यानुसार एक प्रारूप बनवून पुण्यातील भूगाव आणि राज्यातील काही शहरांमध्ये निरीक्षणे नोंदवली व त्याचा अभ्यास केला आणि त्यातून पावसाचा अचूक अंदाज बांधणे शक्य झाले आहे.

मान्सूनचे आगमन २७ मे रोजी केरळमध्ये तर ८ जूनला रत्नागिरीत, ९ जूनला पुण्यात, १७ जूनला अहमदनगर इथे व २७ जूनला इंदोर इथे मान्सून पोहचेल. जून महिन्यात तुरळक पाऊस पुणे परिसरात होईल, असा अंदाज होता, तो तंतोतंत खरा ठरला.

मान्सूनपूर्व पाऊस देशात सरासरी कमी राहील तर मान्सूनमध्ये महाराष्ट्रात पावसाचे चांगले प्रमाण राहील. गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी संपूर्ण देशात चांगला पाऊस अपेक्षित आहे, ज्यामुळे खरीप आणि रब्बी दोन्ही हंगाम चांगले जातील.

दक्षिणेकडील भागापेक्षा मध्य भारत व विंध्यांचलाचा वरच्या भागात अधिक पाऊस राहील. दुसरीकडे रत्नागिरीमध्ये १५ जुलैपासून पाऊस वाढेल तर सिंधुदूर्ग मध्ये तो कमी व्हायला लागेल. नागपूर, यवतमाळ येथे देखील पावसाचे प्रमाण मध्यम स्वरुपाचे राहील मात्र जळगाव मध्ये हे प्रमाणे बरेच जास्त राहील, असे माझ्या निरीक्षणातून दिसते.

देशभरात प्रामुख्याने १ जुलै ते २ ऑगस्टपर्यंत पाऊस चांगला राहील तर मध्य भारतात प्रचंड प्रमाण राहील असे दिसते. २ ऑगस्ट नंतर व सप्टेंबरमध्ये हेच प्रमाण मध्यम राहील तर परतीचा मान्सून वेळेवर होईल व गेल्या वर्षीपेक्षा अधिक चांगला राहील. नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात पुण्यात पाऊस होणार नाही, तसेच तामिळनाडूत त्याचे प्रमाण उत्तम राहील.

या अभ्यासानुसार शेती आणि पिके त्यानुसार कोणत्या दर्जाची राहतील व त्याचे कसे प्रमाण कसे राहील हे देखील अचूकपणे मांडता येणे शक्य होत आहे.

याबरोबरच देशाची आर्थिक परिस्थिती, सभोवती असणाऱ्या देशांबरोबरचे संबंध व त्या देशांची स्थिती या विषयी भाष्य करणे शक्य आहे. ऑक्टोबर २५ च्या दरम्याने युद्धजन्य परिस्थिती चीनव्याप्त सिमेवरती होईल व त्याच प्रमाणे चीन, कंबोज (आत्ताचा चीनचा पूर्व भाग व अफगाणिस्तानचा उत्तर भाग) आणि पूर्व युरोपियन देशांमध्ये राजकीय उलथापालथ व नुकसान त्या दरम्याने होऊ शकते.

अधिक माहितीसाठी संपर्क –
डॉ. गायकैवारी (9422001222)

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *