११.१९ कोटींच्या करचोरी प्रकरणी एकास अटक महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाची कारवाई

GST Govt of Maharashtra हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News

Maharashtra Goods and Services Tax Department took action in a tax evasion case of Rs 11.19 crore

११.१९ कोटींच्या करचोरी प्रकरणी एकास अटक महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाची कारवाई

मुंबई : 50.88 कोटींची खरेदी दाखवून 11.19 कोटी रुपयांची चुकीची कर वजावट दाखवून शासनाचा महसूल बुडविल्याप्रकरणी महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने कार्यवाही करुन मे. जातवेदास कंस्ट्रक्शन कंपनी प्रा.GST Govt of Maharashtra हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News लि. कंपनीचे संचालक हितेश अमृतलाल पटेल, (42), घाटकोपर यांना मंगळवार दि. 14 रोजी अटक केली.

अन्य दोन संचालक अशोक मेवाणी व नरेंद्र पटेल यांचा शोध सुरु आहे, अशी माहिती महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

महानगर दंडाधिकारी यांनी हितेश पटेल यास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या कारवाईत अन्वेषण – अ, मुंबईचे राज्यकर सहआयुक्त राहुल द्विवेदी, राज्यकर उपायुक्त राजेंद्र टिळेकर, संजय सावंत, सहायक राज्यकर आयुक्त संजय शेटे, नामदेव मानकर सहभागी झाले होते.

महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत करचोरीप्रकरणी 19 जणांना अटक केली आहे.

हडपसर न्युज ब्युरो

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *