Action taken against fake cheese factory
मांजरी खुर्द येथील नकली पनीर कारखान्यावर कारवाई
पुणे : अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्यावतीने हवेली तालुक्यातील मांजरी खुर्द येथील मे. आर. एस डेअरी फार्म या विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या कारखान्यावर छापा मारुन नकली पनीर बनवित असल्याचे आढळून आल्याने कारवाई करुन साठा जप्त करण्यात आला.
या कारखान्यावर छापा टाकून १ लाख ९७ हजार ७८० रुपये किंमतीचे ८९९ किलो नकली पनीर, पनीर बनविण्यासाठी वापरण्यात येणारी २ लाख १९ हजार ६०० रुपये किंमतीची ५४९ किलो स्किम्ड मिल्क पावडर आणि ४ हजार ५४४ रुपये किंमतीचे २८.४ किलो आर बी डी पामोलीन तेल असा एकूण ४ लाख २१ हजार ९२४ रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.
पनीर हा पदार्थ नाशवंत असल्याने जप्त केलेला साठा जागेवरच नष्ट करण्यात असून घेण्यात आलेले नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहे.
सण उत्सवांच्या कालावधीत ग्राहकांची फसवणूक करुन कमी दर्जाचे अन्न पदार्थ विक्री होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारची बाब निदर्शनास आल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन प्रशासनाचे पुणे विभागाचे सह आयुक्त संजय नारागुडे यांनी केले आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com