Action was taken by Forest Department to eradicate encroachment on 68 acres
वनविभागाकडून ६८ एकरावरील अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई
पुणे : वनजमिनीवर अवैधपणे ताबा करून शेती तसेच घरांचे बांधकाम केलेल्या सुमारे ६८ एकर वनजमिनीवरील अतिक्रमणे काढण्याची कार्यवाही दौंड तालुक्यातील राहू येथे करण्यात आली.
राहू येथील वनजमीन सर्व्हे क्रमांक २०८, १९८, १९९,२०३,२०० यावर सर्व मिळून एकूण ६८ एकर अतिक्रमण झाल्याचे वनविभागाच्या निदर्शनास आले. अतिक्रमणधारकांना ताबा सोडण्याबाबत कायदेशीर संबंधितांना नोटीस देण्यात आली. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पार पाडून सर्व अतिक्रमण निर्मुलन करुन संबंधित अतिक्रमणधारकांवर भारतीय वन अधिनियम १९२७ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील प्रक्रिया दौंडच्या वनपरिक्षेत्र अधिकारी करीत आहेत.
ही कार्यवाही प्रादेशिक मुख्यवनसंरक्षक एन. आर. प्रवीण आणि उपवनसंरक्षक राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक दीपक पवार, सहायक वनसंरक्षक मयूर बोठे, दौंडच्या वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे, बारामतीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर, अजित सूर्यवंशी यांनी केली.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com