विद्यापीठाकडून ललित संगीत व संगीत आस्वाद अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू

Savitribai Phule Pune University, Hadapsar News, Hadapsar Latest News,हडपसर मराठी बातम्या

Admission to fine music and Music Appreciation Courses started from the university

विद्यापीठाकडून ललित संगीत व संगीत आस्वाद अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू

पुणे : ललित कला केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने कल्चरल सेंटरच्या सहयोगाने संगीतविषयक दोन प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु केले आहे. अनेकांना गाणं

Savitribai Phule Pune University
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.

गाण्याची आवड असते पण याची सुरुवात कुठून करावी याची माहिती नसते. संगीतातील मूलभूत गोष्टीची माहिती देणारा मराठी ललित संगीत अभ्यासक्रम हा सुरू केला आहे. यासाठी १५ ते ६० अशी वयोमर्यादा आहे.

संगीत आस्वाद कसा घ्यावा याचे बारकावे सांगणारा दुसरा प्रमाणपत्र अभ्यासक्रम असून यासाठी वयाची कोणतीही अट नाही. या दोन्ही अभ्यासक्रमाची ही दुसरी बॅच असून विद्यार्थ्यांसोबत अनेक ज्येष्ठ मंडळीही याला प्रवेश घेतात.

मराठी ललित संगीत

ह्यात मराठी भावगीत, नाट्यसंगीत, भक्तिगीत, गझल, लावणी, इ.चा समावेश आहे. गायनासह आवाजसाधना, शब्दोच्चार, माइकचा वापर, नोटेशन, इ. बाबींची माहिती विविध तज्ज्ञ कलाकार विद्यार्थ्यांना देतात. अभ्यासक्रमाचा कालावधी पाच महिने असून हा अभ्यासक्रम ‘ब्लेंडेड मोड’मध्ये, म्हणजे प्रत्यक्ष व ऑनलाईन अशा दोन्ही प्रकारे होणार आहे. सोमवार, बुधवार, शुक्रवार असे ३ दिवस सायं. ५ ते ७ वर्ग होतील. प्रवेश अर्जाची अंतिम तारीख १५ जुलै २०२२ असून दि. १८ जुलै २०२२ पासून वर्ग सुरु होत आहेत. प्रवेशअर्ज पुढील लिंकवर भरावा – https://forms.gle/z7SSpvzzxDDGv9Jq9

संगीत आस्वाद Music Appreciation Course

‘संगीताचा आस्वाद कसा घ्यावा’ याबद्दल उत्सुकता असणारे श्रोते, तसेच संगीत, नृत्य, नाट्य, चित्र इ. कलांचे विद्यार्थी ह्या दोन्हींसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त आहे. जगभरातील संगीताचे प्रकार, लोकसंगीतापासून फिल्मसंगीतापर्यंतचे अनेक प्रवाह, भारतीय शास्त्रोक्त संगीत व त्यातील गायन-वादन प्रकार, वाद्ये, घराणी, इ.चा परीचय ह्या अभ्यासक्रमात करून घेता येईल. तज्ज्ञांची व्याख्याने, कलाकारांची प्रस्तुती, ध्वनिमुद्रणे व लघुपट यांचा समावेश अभ्यासक्रमात आहे. अभ्यासक्रम चार महिन्यांचा असून प्रत्येक आठवड्यातील सोमवार, बुधवार, शुक्रवार सायं. ६ ते ८ या वेळात ऑनलाईन वर्ग होतील. बॅच ऑगस्ट ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत होईल. प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख २५ जुलै २०२२ असून पुढील लिंकवर अर्ज भरता येतील https://forms.gle/nEDEcZCkzigMLsgN8

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *