It is important to adopt hard work, dedication, honesty and self-confidence if one wants to achieve high goals
उच्च ध्येय प्राप्त करण्यासाठी कष्ट, मेहनत, प्रामाणिकपणा आणी आत्मविश्वास या गोष्टी अंगीकारणे महत्त्वाचे
हडपसर : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, आधारस्तंभ आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अण्णासाहेब मगर महाविद्यालयात, व्हॉलीबॉल, बॉल बॅडमिंटन, टेबल टेनिस, या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
सदर क्रीडा स्पर्धाच्या उद्घाटन राष्ट्रपती पदक विजेते व आर्यन मॅन डॉ. शंतनू जगदाळे यांच्या शुभहस्ते झाले. उद्घाटन प्रसंगी आपल्या मनोगतामध्ये खेळाडूंना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले, “व्यायाम, आहार व शिस्त खेळाडूंच्या अंगी असणे आवश्यक आहे.
“महाविद्यालयीन जीवनामध्ये जर उच्च ध्येय प्राप्त करावयाचे असेल तर कष्ट, मेहनत, प्रामाणिकपणा आणी सर्वात महत्त्वाचं स्वतःवरील आत्मविश्वास या गोष्टी अंगीकारणे महत्त्वाचे आहे.”
डॉ. शंतनू जगदाळे
या प्रसंगी प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे उपप्राचार्य अनिल जगताप, श्री.विक्रम जाधव उपस्थित होते. या स्पर्धेत 135 खेळाडूंनी सहभाग घेतला. प्रास्ताविक प्रा. संजीव पवार यांनी केले तर आभार प्रा.प्रितम ओव्हाळ यांनी मानले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com