After the split in Shiv Sena, both the groups show their strength and try to bully each other in a legal way.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर दोन्ही गटाचं शक्तीप्रदर्शन आणि कायदेशीर मार्गाने एकमेकांवर कुरघोडीचा प्रयत्त्न
मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याबाबत दावे प्रतिदावे केले जात आहेत. राजकीय शक्तीप्रदर्शन तसंच संवैधानिक तरतुदींच्या आधारे एकमेकांवर कायदेशीर मार्गाने कुरघोडी करण्याची चर्चा दोन्ही गटात होत आहे.
शिवसेनेचे ४० आणि १२ अपक्ष अशा ५२ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला असल्याचं समजत आहे. या आमदारांसह आपला पक्ष शिवसेना असून आपल्या गटाला मूळ पक्ष म्हणून मान्यता मिळवण्याच्या प्रयत्नात शिंदे आहेत.
इकडे सामान्य शिवसेना कार्यकर्त्यांचं समर्थन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची बैठक आज मुंबईत शिवसेना भवन मुख्यालयात झाली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्या सर्वांशी ऑनलाईन संपर्क साधला. या बंडापाठीमागे भाजपाचं कारस्थान असून बंडखोरांनी आपला विश्वासघात केल्याची भावना ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली. ठाकरे यांच्याशी चर्चा करण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मातोश्री बंगल्यावर गेल्याचं वृत्त आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com