Call for applications for agricultural awards by June 30
कृषि पुरस्कारांसाठी ३० जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
कृषि विभागामार्फत २०२२ या वर्षासाठी कृषि पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत
पुणे : कृषि क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्याबद्दल कृषि विभागामार्फत देण्यात येणाऱ्या पुरस्कारांसाठी शेतकरी, संस्था, गट आदींनी ३० जूनपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन राज्याचे कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे.
राज्य शासन कृषि विभागामार्फत राज्यात कृषि आणि संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कार्य करणाऱ्या, कृषि उत्पादन आणि उत्पन्न वाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा तसेच कृषि विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्था, गट यांना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.
यामध्ये डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, सेंद्रीय शेती कृषिभूषण, उद्यानपंडीत, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, युवा शेतकरी पुरस्कार व कृषि विभागामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येते.
कृषि विभागामार्फत २०२२ या वर्षासाठी कृषि पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. तरी जास्तीत जास्त शेतकरी गट, संस्था, व्यक्तींनी आपले प्रस्ताव नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे दिनांक ३० जुन २०२३ पर्यंत सादर करावेत. अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com