Ajaan should be given within the limits of the level of voice fixed by the Supreme Court – Raj Thackeray
सर्वोच्च न्यायालयानं निश्चित केलेल्या आवाजाच्या पातळीची मर्यादा पाळून अजान दिली जावी- राज ठाकरे
हे भोंगे काढण्यासाठी नागरिकांनी पोलिस ठाण्यांना पत्र द्यावीत, तक्रार दाखल करावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं निश्चित केलेल्या आवाजाच्या पातळीची मर्यादा पाळून अजान दिली जावी, असं त्यांनी आज वार्ताहर परिषदेत सांगितलं.
जोपर्यंत भोंगे चालू राहतील तोपर्यंत आपलं आंदोलन चालू राहील, असं ते म्हणाले. मंदिरावर असलेल्या भोंग्याचाही कुणाला त्रास होत असेल, तर तोही हटवला पाहिजे, असंही ते म्हणाले.
मुंबईतल्या अनेक भागांत मनसे कार्यकर्त्यांनी मशिदींसमोर हनुमान चालिसाचं पठण केलं. राज ठाकरे यांनी दिलेला इशारा आणि आंदोलनामुळे रात्रीपासून राज्यभरात पोलीस बंदोबस्त आहे, तर अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू आहे.
धुळे इथं मनसे जिल्हाध्यक्ष दुष्यंतराजे देशमुख आणि त्यांचे सहकारी आज सकाळी शिवतीर्थ इथं जमले असताना त्यांना पोलिसांनी तात्काळ अटक केली.
नाशिक आणि मालेगावमध्ये पोलीस यंत्रणेनं विशेष दक्षता घेतल्यानं तणाव निर्माण होऊ शकला नाही. मालेगाव मध्ये बहुतांश मशिदींमध्ये पहाटेची नली, मात्र पेालीसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, भोंगे न लावता प्रार्थना पार पडली.
पालघरमध्ये मनसेचे शहर अध्यक्ष सुनील राऊत यांच्यासह इतर पाच कार्यकर्त्यांना पालघर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.