विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अत्यंत आवश्यक

Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

An aadhaar card is essential to avail of various schemes

विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अत्यंत आवश्यक

थेट लाभ हस्तांतरण योजनेंतर्गत लाभार्थींनी आधार नोंदणी करावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : सामाजिक न्याय विभागासह इतर विभागांच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अत्यंत आवश्यक आहे. थेट लाभ हस्तांतरण योजनेंतर्गत लाभ मिळवण्यासाठी नागरिकांनी आधार नोंदणी करावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस हडपसर मराठी बातम्या  Hadapsar Latest News Hadapsar News

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) प्रादेशिक कार्यालय, मुंबई व माहिती तंत्रज्ञान संचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने “महाराष्ट्र राज्यात आधारचा वापर वाढविण्यासाठी तसेच प्रक्रिया सुलभ करण्यासाठी अलिकडील काळात राबविण्यात आलेले उपक्रम” या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन सह्याद्री अतिथीगृह, येथे करण्यात आले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

समाजातील वंचित घटकांना सामावून घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. आधार सक्षमीकरण आणि नागरिकांच्या कल्याणासाठी डीबीटी योजनांच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सौरभ गर्ग यांनी गेल्या दशकात आधारने केलेल्या प्रगतीबद्दल विवेचन केले.

आधार प्रमाणीकरण ऑनलाइन प्रमाणीकरणाद्वारे एखाद्याची ओळख सिद्ध करण्यासाठी त्वरित यंत्रणा प्रदान करते. (UIDAI) रहिवाशांच्या राहणीमानात सुधारणा करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू ठेवेल यावरही त्यांनी भर दिला.

या कार्यशाळेच्या विविध सत्रांमध्ये आधारची वैशिष्ट्ये, आधार नोंदणी आणि घेतलेले पुढाकार, आधारच्या वापरावरील प्रमुख विकास, डेटा गोपनीयता आणि माहिती सुरक्षा, यावर चर्चा करण्यात आली.

राज्य सरकारसाठी थेट लाभ हस्तांतरण आणि त्याची अंमलबजावणी प्रक्रिया. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी थेट लाभ हस्तांतरणाचे महत्त्व आणि राज्य एकत्रित निधीतून वितरित केलेल्या योजना आणि लाभांसाठीच्या अधिसूचनांवर प्रकाश टाकला.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *