An awareness program on road safety
रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने २० नोव्हेंबर रोजी रस्ते सुरक्षा विषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
रस्ते अपघातांप्रती स्वयंसेवी संस्था, शासकीय यंत्रणा, प्रसारमाध्यमे तसेच नागरिकांचे लक्ष वेधणे, रस्ते अपघात टाळण्याच्या प्रयत्नांना बळकट करणे, रस्ते अपघातातील जखमींना वेळेत व योग्य उपचार व मदत मिळवून देणे या उद्देशाने रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांची आठवण म्हणून २० नोव्हेंबर रोजी स्मरणदिन साजरा करण्यात येतो.
पुणे शहरातील १५ चौकांमध्ये मोटार ड्रायव्हिंग शाळा, वाहन वितरक, पीयूसी केंद्र, वाहतूकदार संघटनेसोबत रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले, तसेच सीटबेल्ट वापरण्याबाबत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे ‘दि परफेक्ट मर्डर’ या नाटकाच्या प्रयोगावेळी कलाकार पुष्कर श्रोत्री,सतिश राजवाडे, प्रिया बापट, पुणे व पिंपरी चिंचवड कार्यालयाचे अधिकारी, नाट्यरसिक यांच्यासमवेत स्मरणदिन पाळून प्रेक्षकांसोबत रस्ता सुरक्षा विषयक प्रतिज्ञा देण्यात आली. स्मरणदिनाचे महत्व नमूद करून रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.
शहरातील सर्व मोटार ड्रायव्हिंग शाळेचे संचालक, वाहन विक्रेते, सेवाभावी संस्था यांनी उपक्रमात सहभाग घेतल्याची माहिती पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांनी दिली आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com