विद्यापीठातील ‘हर घर तिरंगा’ अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद

Huge response from across the state to Savitribai Phule Pune University's Har Ghar Tiranga and Swarajya Festival सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हर घर तिरंगा आणि स्वराज्य महोत्सवाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

The enthusiastic response to the ‘Har Ghar Triranga’ campaign in the university

विद्यापीठातील ‘हर घर तिरंगा’ अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद

३० हजार विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांनी केले तिरांग्यासोबत फोटो अपलोडHuge response from across the state to Savitribai Phule Pune University's Har Ghar Tiranga and Swarajya Festival सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हर घर तिरंगा आणि स्वराज्य महोत्सवाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

पुणे :  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हर घर तिरंगा आणि स्वराज्य महोत्सवाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत ३० हजारहून अधिक विद्यार्थी, शिक्षक, नागरिक अशा सर्वांनी राष्ट्र ध्वजासोबत आपले फोटो काढून विद्यापीठाच्या लिंकवर अपलोड केले आहेत.

या फोटोंच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करत आहे. ९ ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या अभियानाची सुरुवात करण्यात आली होती.

विद्यापीठाकडून राबविल्या जाणाऱ्या या अभियानात केवळ जागतिक विश्व विक्रम म्हणून सहभागी न होता या निमित्ताने देशाच्या ७५ वर्षाच्या राष्ट्राच्या स्वातंत्र्याच्या आठवणी जागविण्याचा दृष्टीने विद्यार्थ्यांनी यात सहभागी व्हावे.
डॉ.संजीव सोनवणे, प्र- कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

दरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी ६०० हून अधिक महाविद्यालये संलग्न आहेत या महाविद्यालयातील सर्वांनाच या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.कारभारी काळे, प्र – कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, अभियानाच्या आयोजन समितीचे अध्यक्ष व व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ.प्रभाकर देसाई यांनी केले आहे.

याबाबत माहिती देताना विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ संतोष परचुरे म्हणाले, राजेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या ही मोहीम जोर धरत आहे. आम्हाला विद्यापीठाच्या कार्यकक्षेत येणाऱ्या पुणे, अहमदनगर आणि नाशिक येथून चांगला प्रतिसाद तर आहे परंतु खेडोपाड्यातून देखील नागरिक व विद्यार्थी त्यांचे फोटो अपलोड करत आहेत.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *